New Labour Code: नवीन कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू झालेला आहे. या नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीत कपात होणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, आता यावर कामगार मंत्रालयाने माहिती दिली आहे.
New Labour Code
New Labour CodeSaam Tv
Published On
Summary

नवीन कामगार कायदा लागू

नवीन कामगार कायद्यात पगारात कपात होणार?

सरकारने दिली माहिती

सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. दरम्यान, या नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार कमी होणार का असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, आता केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी केली जाणार नाही. जर भविष्य निर्वाह निधीत १५००० रुपयांच्या मर्यादेत कपात कायम राहिली तर तुमच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही.

New Labour Code
New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

१५००० रुपयांपेक्षा जास्त पीएफ कपात ऐच्छिक

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कंपन्या १५००० रुपयांपेक्षा जास्त पीएफ कपातीची सक्ती करु शकत नाही. याचा अर्थ असा की, पीएफ योगदानाच्या १२ टक्के रक्कम ही १५,००० रुपयांपर्यंतच अनिवार्य आहे. त्यापेक्षा पीएफ खात्यात जास्त रक्कम जमा करायची की नाही हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. यामुळे तुमची टेक होम सॅलरी कमी होणार नाही.

नवीन कामगार कायद्यातील बदल काय? (New Labour Code Changes)

सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या. यामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला. यामध्ये एकसमान वेतन, वेतनाच्या आधारावर पीएफ, ग्रॅच्युटी आणि ESI ची कॅल्क्युलेशन होणार आहे.यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या CTC रचना पुन्हा तयार करावी लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या इन हँड सॅलरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

मंत्रालयाने सांगितले की, नवीन पीएफ व्यवस्थेमुळे टेक होम सॅलरी कपात होत नाही. पीएफ हा तुमच्या पगारावर आधारित असतो. तुम्ही १५००० रुपयांपर्यंत पीएफ जमा करु शकतात.त्यापेक्षा जास्त पैसे जमा करायचे की नाही हे कर्मचाऱ्यावर अवलंबून असते.

New Labour Code
Post Office RD Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ५ लाख; वाचा कॅल्क्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com