New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

New Labour Codes Now Gratuity Get in 1 Year: केंद्र सरकारने कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल केले आहे. आता तुम्हाला १ वर्षात ग्रॅच्युइटीचा लाभ घेणार मिळणार आहे. याआधी ५ वर्षानंतर ग्रॅच्युइटीचा फायदा मिळणार आहे.
New Labour Codes
New Labour CodesSaam Tv
Published On
Summary

कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

कामगार कायद्यात केले महत्त्वाचे बदल

आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटीचा लाभ

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल केला आहे.यामध्ये कामगारांसाठी कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत केंद्रीय कामगार मंत्रालयाने २९ कामगार कायदे कमी करुन फक्त ४ संहिता केल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार आहे.

New Labour Codes
EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या नवीन संहिता सर्व कामगारांना (गिग वर्कर्स, स्थलांतरित कामगार, महिला कामगार) चांगले वेतन, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवेची हमी देतील. कायद्यात ग्रॅच्युइटीमध्येही बदल करण्यात आले आहे. आता तुम्हाला १ वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटीचा लाभ घेता येणार आहे.

५ नव्हे तर एका वर्षात घेता येणार ग्रॅच्युइटीचा लाभ (Gratuity Benefit in 1 Year)

कामगार कायद्यात ग्रॅच्युइटीचा एक नियम होता. त्यामध्ये जर तुम्ही सलग ५ वर्षे सेवा केली तर तुम्हाल ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत होता. मात्र, आता सरकारने ही अट काढून टाकली आहे. आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉइजला ग्रॅच्युइटीसाठी ५ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही १ वर्ष काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी काढू शकतात.

या नवीन नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये रजा, वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे. त्यांना वेतन नेहमीप्रमाणेच दिले जाईल. त्याचसोबत इतर फायदेदेखील मिळतील. कंत्राटी भरती काम करुन थेट भरतीला प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

New Labour Codes
EPFO: नोकरी सोडली, PF काढायचाय? तर त्याआधी हे काम कराच; अन्यथा येतील अडचणी

ग्रॅच्युइटी म्हणजे काय? (What is Gratuity)

ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामाच्या बदल्यात दिलेली एक भेट (ठरावीक रक्कम) असते. आतापर्यंत पाच वर्ष सेवा केल्यानंकर ग्रॅच्युइटी मिळायची. आता याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आता दरवर्षी तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळणार आहे.ही कर्मचाऱ्यांसाठी एक आर्थिक मदत असते. कंपनी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यावर तुम्हाला ग्रॅच्युइटी एकत्र मिळते.कारखाना, खाणी, तेल क्षेत्र, रेल्वे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा होतो.

New Labour Codes
EPFO News: काही मिनिटांत काढा पीएफ; त्याआधी हे काम कराच; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com