

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. पीएफ अकाउंट हे ईपीएफओद्वारे चालवले जाते. पीएफ खात्यातील ही एक गुंतवणूक असते. हे पैसे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने काढू शकतात. दरम्यान, नोकरी सोडल्यानंतर अनेकदा पीएफ काढताना अडचणी येतात. अनेकदा नोकरी सोडल्याची तारीख चुकीची टाकल्यामुळे पीएफचे पैसे काढण्यासाठी अडचण येते.
जर तुम्ही नोकरी सोडली तर तुम्हाला तारीख ऑनलाइन पद्धतीने अपडेट करावी लागते. जर तुम्हाला तुमच्या जुन्या कंपनीतील सेटलमेंट पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करावी लागेल.यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.
1. लॉगिन करा
सर्वात आधी तुम्हाला EPFO Member Portal वर जायचे आहे. यानंतर युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
2. मॅनेज सेक्शनवर जा
यानंतर तुम्हाला मॅनेज सेक्शनवर जायचे आहे. तिथे Mark Exit ऑप्शनवर क्लिक करा.
3. पीएफ अकाउंट निवडा
यानंतर Employment ड्रॉपडाउनमधून पीएफ अकाउंट नंबर निवडा. यानंतर तुम्ही एक्झिट डेट अपडेट करु शकतात.
4. शेवटची तारीख अपडेट करा
यानंतर तुम्ही एक्झिट डेट अपडेट करा. त्याचसोबत त्यामागचे कारणदेखील लिहा.
5. ओटीपी व्हेरिफिकेशन
यानंतर ओटीपीवर क्लिक करा. तुमच्या आधार लिंक नंबरवर ओटीपी येईल.
6. अपडेट करा
यानंतर चेकबॉक्समध्ये टिक करा. तुम्हाला अपडेटचा मेसेज येईल. तिथे तुम्ही ओकेवर क्लिक करा.
7. अपडेट झाल्याचा मेसेज
यानंतर तुम्हाला तारीख अपडेट झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुमचे पीएफ ट्रान्सफर किंवा क्लेमचे काम तुम्ही करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.