EPFO चा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
EPFOने लाँच केली Employees Enrolment Scheme
EPFOची नवीन वेबसाइट लाँच
ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. श्रम व रोजगार मंत्रालयाने Employees Enrolment Scheme 2025 ची सुरुवात केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ईपीएफओअंतर्गत सामाजिक सुरक्षा देणे आहत. याचसोबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओसाठी नवीन वेबसाइट www.epfo.gov.in देखील लाँच केली आहे. यामध्ये इंटरफेस, नेविगेशन आणि इतर सर्व्हिसचा लाभ सोप्या पद्धतीने घेता येणार आहे.
काय आहे Employees Enrolment Scheme?
या योजनेत नियोक्त्यांना १ जुलै २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ मध्ये नोकरीवर रुजू झालेल्या परंतु पीएफ कव्हरमधून वगळलेल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये नोंदणी करण्याची संधी देते. ही योजना १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. आता नियोक्ते त्यांचे जुने रेकॉर्ड दुरुस्त करु शकतात आणि सहा महिन्यांसाठी पीएफ योजनेत कर्मचाऱ्यांना जोडू शकतात.
कोण अर्ज करु शकतात?
ही योजना सर्व कंपन्या आणि संस्थांना लागू होणार आहे. नियोक्ते आता त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ECR) प्रणालीद्वारे EPFO पोर्टलवर प्रविष्ट करु शकतात. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी फेस ऑथेंटिकेशन आधारित UAN हे उमंग अॅपद्वारे जनरेट करावे लागणा आहे.
कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा? (Employees Enrolment Scheme Benefits)
या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन आणि विमा यासारखे फायदे मिळणार आहेत. जे कर्मचारी अजूनपर्यंत ईपीएफओशी जोडले गेले नाही ते आता जोडले गेले जाणार आहेत. यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना लाँग टर्म सेव्हिंग, रिटायरमेंट सिक्युरिटी आणि सोशल संरक्षणाचा फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.