EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

PF Withdrawal Rules: ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार, आता नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठी १२ महिने थांबावे लागणार आहे. मात्र, ७५ टक्के रक्कम बेरोजगारीत काढता येईल.
EPFO News
EPFO NewsSaam Tv
Published On

EPFO च्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. निर्णयामध्ये पीएफ काढण्याच्या नियमात बदल केले आहे. आतापासून जर कोणी नोकरी सोडली, तर दोन महिन्यांनी पूर्ण पीएफचे पैसे काढता येत होते. पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. पुढे संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असले तर बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा.

EPFO च्या नव्या नियमानुसार, नोकरी सोडल्यानंतर त्या सदस्याला पूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठी १२ महिने थांबावे लागणार आहे. म्हणजेच आता फुल विथड्रॉलसाठी एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, बेरोजगारीच्या काळात ७५ टक्के रक्कम काढण्याची परवानगी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

EPFO News
Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

EPFO च्या म्हणण्यानुसार, हा निर्णय कर्मचार्‍यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी घेण्यात आला आहे. पूर्वी अनेक कर्मचारी नोकरी सुटताच पूर्ण पैसे काढायचे. त्यामुळे त्यांच्या पेन्शन पात्रतेवर आणि भविष्य निधीवर परिणाम होतो. यासोबत पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया देखील सोपी केली आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांना पैसे काढण्यासाठी ओळखपत्र, बँक डिटेल्स, अर्जासोबत इतर दस्तऐवज द्यावे लागत. परंतु आता नव्या नियमानुसार कोणत्याही प्रकारच्या कारणाशिवाय किंवा दस्तऐवजांशिवाय कर्मचारी आपले पैसे काढू शकतील.

संस्थेचे म्हणणे आहे की, हा बदल कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी करण्यात आला आहे, जेणेकरून रिटायरमेंटनंतर किंवा बेरोजगारीच्या काळात त्यांना त्यांच्या स्वतःच्या पैशांपर्यंत सहज आणि जलद प्रवेश मिळू शकेल. हा नवा नियम अमलात आल्यानंतर आता कर्मचार्‍यांना आर्थिक नियोजन करताना अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.

EPFO News
Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com