Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Face Care: चेहऱ्यावर सूज, त्वचा फिकट पडणे किंवा डोळ्यांभोवती पिशव्या दिसत आहेत का? हे संकेत किडनी फेल होण्याचे असू शकतात. वेळेत काळजी घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.
Face Care Tips
Kidney Disease Symptomsgoogle
Published On
Summary

चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली सूज दिसणे हे किडनी डॅमेजचे सुरुवातीचे संकेत असू शकतं.

किडनी नीट कार्य न केल्यास शरीरात द्रव साचून एडिमा होतो.

त्वचा कोरडी पडणे, रंग फिकट पडणे, किंवा खाज येणे ही देखील लक्षणे आहेत.

वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास किडनी फेल होण्यापासून बचाव करता येतो.

किडनी हा शरीरातला अत्यंत महत्त्वाची अवयव असतो. किडनीचे कार्य म्हणजे शरीरातील अपायकारक द्रव्ये, टॉक्सिन्स आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे. म्हणजेच शरीराच्या आतल्या भागात संतुलन राखण्याचे काम किडनी पार पाडत असते. मात्र जेव्हा किडनी आजारी पडते तेव्हा शरीरात टॉक्सिन्स साचायला सुरुवात होते. मग हळूहळू अनेक गंभीर आजार उद्भवतात. यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका जास्त वाढतो.

ब्रिटनमधील हेल्थ वेबसाइट 'मेडिकल न्यूज टुडे'नुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याच वेळा लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, आजार वाढत गेल्यानंतर शरीरात अपायकारक घटक साचल्याने त्वचेवर आणि चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज, डोळ्यांभोवती पाणी साचल्यासारखे वाटणे, त्वचेचा रंग बदलणे किंवा ती कोरडी, खाज येणारी होणे हे संकेत किडनीच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याचे सूचक असू शकतात.

Face Care Tips
Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

किडनी नीट काम न केल्यास शरीरातील द्रव पदार्थ बाहेर न पडता जमा होतात आणि त्यामुळे फ्ल्यूड रिटेन्शन म्हणजेच एडिमा होतो. अशा स्थितीत चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांखाली पिशव्या तयार होणे किंवा चेहऱ्याचा रंग फिकट पडणे हे लक्षणे सामान्य आहेत.

चेहरा किंवा डोळ्यांच्या खाली सूज दिसणे हे अनेकदा किडनी डॅमेजचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. कारण, किडनी शरीरातील अपायकारक द्रव्ये आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करण्याचे काम करते. जेव्हा ती क्षमता कमी होते तेव्हा शरीरात पाणी साचते आणि सूज दिसते. त्याचप्रमाणे किडनी खराब झाल्यास शरीरात विषारी पदार्थ साचल्याने त्वचा कोरडी पडते, खाज येते आणि तजेला कमी होतो.

Face Care Tips
Liver Cancer Signs: त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा वाढत चाललाय? लिव्हर कॅन्सरचा धोका तर नाही ना, वेळीच व्हा सावध

टिप

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून उपचार करू नका. किडनीच्या आजारात जास्त पाणी पिणेही काहीवेळा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पाण्याचे सेवन आणि आहार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवा. योग्य वेळी उपचार घेतल्यास किडनीचे कार्य सुरळीत राहू शकते आणि गंभीर परिणाम टाळता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com