
हिवाळ्याचा हंगाम सुरु होताच बाजारात हिरवेगार शिंगाडे दिसू लागतात. शिंगाडे चविष्ट असण्याबरोबरच शरीरासाठीही अत्यंत पौष्टिक असतात. हे फळ पाणथळ भागातच उगवतं. शिंगाड्यांमध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, आयर्न, झिंक आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराला आतून ताकद मिळते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
ज्यांना वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी शिंगाडे अमृताप्रमाणे काम करतात. यात असलेले आयर्न आणि मिनरल्स शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात. उकडलेले शिंगाडे किंवा शिंगाड्याचा हलवा खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होते.
अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठीही शिंगाडे अत्यंत फायदेशीर आहेत. यातील लोह तत्वामुळे शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. महिलांना मासिक पाळीनंतर किंवा प्रसूतीनंतर होणारी कमजोरी कमी करण्यासाठी शिंगाडे खाणे उपयुक्त आहे. नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
थायरॉईडच्या त्रासाने ग्रस्त लोकांसाठीही शिंगाडे उत्तम पर्याय आहेत. यात असलेले आयोडीन आणि पोटॅशियम थायरॉईड ग्रंथींचे संतुलन राखतात आणि हार्मोन्स नियंत्रित ठेवतात. त्यामुळे सूज, वजनवाढ किंवा थकवा यासारख्या समस्या कमी होतात. थायरॉईड असलेल्या व्यक्तींनी शिंगाड्याचे पीठ बनवून पराठा किंवा लाडू खावेत, यामुळे ऊर्जा वाढते आणि मेटाबॉलिझम सुरळीत राहते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठीही शिंगाडे अतिशय उपयुक्त आहेत. यातील फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि ग्लूकोज हळूहळू शरीरात शोषले जाते. यामुळे भूक कमी लागते आणि वजनावर नियंत्रण राहते.
त्वचेसाठीही शिंगाडे नैसर्गिक टॉनिकसारखे आहेत. यातील व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात ओलावा टिकवतात आणि चमक वाढवतात. नियमित सेवनाने सुरकुत्या, डाग-धब्बे कमी होतात आणि त्वचा तजेलदार बनते.
उपवासाच्या काळात शिंगाड्याच्या पिठाचे हलवे, पराठे किंवा टिक्की लोकप्रिय आहेत. हलवा तयार करताना देसी तुपात पीठ भाजून त्यात दूध आणि गूळ घातला जातो, तर पराठा किंवा टिक्की करताना उकडलेले बटाटे आणि मसाले मिसळून तव्यावर शेकले जातात. हे पदार्थ चविष्ट असण्याबरोबरच उर्जादायीही आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.