
लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा, थकवा, वजन कमी होणे हे सामान्य पण गंभीर संकेत असतात.
वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उपचार परिणामकारक ठरतात.
आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीने लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो.
लिव्हर कॅन्सर हा अत्यंत आक्रमक प्रकारचा कॅन्सर मानला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याची चुकीच्या पदार्थांमुळे आणि इतर दैनंदिन जीवनातल्या चुकीच्या गोष्टी केल्याने तुम्हाला या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. जगभरात या आजारामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणालाही हा आजार होऊ शकतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे ओळखणे कठीण असतात. शिवाय वेळेवर उपचार होत नाही. मात्र काही सुरुवातीची संकेत शरीर देत असते, जी दुर्लक्षित करू नयेत.
अचानकपणे वजन कमी होणे हे त्यापैकी एक प्रमुख लक्षण आहे. जर तुम्हाला आहारात काही बदल न करता वजन कमी जाणवत असेल तर ही लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्याची सुचना असू शकते. लिव्हर कॅन्सरमुळे शरीरातील पोषकतत्वांचे शोषण कमी होते. भूक न लागणे हे आणखी एक सामान्य लक्षण आहे. लिव्हर हे पचनक्रियेत महत्त्वाचे कार्य करतं. त्यामुळे त्यात अडथळा आल्यास खाण्याची इच्छा कमी होते. अनेक रुग्णांना थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. या अवस्थेला 'अर्ली सॅटायटी' म्हणतात.
पोटाच्या वरच्या उजव्या बाजूस दुखणे हेही सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारे लक्षण आहे. ही वेदना कधी बोथट तर कधी तीव्र स्वरूपाची असते आणि खांद्यापर्यंत किंवा पाठीपर्यंत जाणवू शकते. अशा प्रकारचे दुखणे वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करू नका. मळमळणे आणि उलट्या होणे हीदेखील लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणेच आहेत. लिव्हर नीट कार्य न केल्याने पचनक्रिया विस्कळीत होते आणि सतत मळमळते. जर हे लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिलं, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
जास्त थकवा आणि अशक्तपणा हे लक्षण अनेकदा सामान्य समजलं जातं, पण हे शरीराच्या कॅन्सरशी लढण्याच्या प्रयत्नाचे संकेत आहे. हा थकवा झोप घेतल्यावरही दूर होत नाही आणि दीर्घकाळ टिकतो. त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा म्हणजेच पिवळ्या काविळीसारखी लक्षणे आढळल्यासही सतर्क व्हावे. हे लक्षण लिव्हरच्या बिलीरुबिन काढून टाकण्याच्या क्षमतेत घट झाल्यामुळे दिसून येते. यासोबतच त्वचेची खाज, गडद रंगाचे मूत्र किंवा फिकट रंगाचे मल हेही संकेत दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.