Liver Cancer: भूक लागत नाहीये, डोळे पिवळे होतायेत? कावीळ नाही असू शकतो लिव्हर कॅन्सरचा धोका

Yellow Eyes Symptoms: भूक लागत नाही, डोळे पिवळे होतायत? ही फक्त कावीळ नसून लिव्हर कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांनी सांगितलेली लक्षणं आणि उपाय जाणून घ्या, आरोग्य जपा.
Symptoms of liver cancer
Symptoms of liver cancersaam tv
Published On

लिव्हर म्हणजे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. कारण लिव्हरचे कार्य हे रक्त शुद्ध करणं, आवश्यक प्रथिने तयार करणं, शरीरात ऊर्जा मिळवणं आणि शरीरा़तल्या विषारी घटकांना बाहेर काढणं यासारखी अत्यावश्यक कार्ये पार पाडतं. बऱ्याच वेळेस लिव्हर खराब होण्याची लक्षणे ही कावीळ सारखी दिसू शकतात. त्यामुळे अनेकांचा ही लक्षणे ओळखाता गोंधळ उडतो. पुढे तज्ज्ञांनी याबद्दल काही महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

सगळ्यात आधी जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. चुकीच्या खाण्याच्या पद्धती, झोप अपूर्ण होणे, व्यायाम टाळणे या शरीरासाठी सगळ्यात आवश्यक गोष्टी मानल्या जातात. त्यामुळे तुमच्या शरीरावर ताण निर्माण होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर होण्यामागील कारणांमध्ये दीर्घकाळ अल्कोहॉलचे सेवन, हेपाटायटिस B आणि C संसर्ग, फॅटी लिव्हर रोग, लठ्ठपणा, किंवा जेनेटीक कारणांचा यात समावेश होतो. कालांतराने लिव्हर कॅन्सर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो, ज्यामुळे रक्तात विषारी पदार्थ जमा होतात आणि त्याचा परिणाम थकवा, अनाकलनीय वजन कमी होणे आणि पचनासंबंधी समस्या यांवर होतो.

Symptoms of liver cancer
Diwali 2025: यंदा दिवाळी कधी आहे? जाणून घ्या धनतेरस, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्थी आणि भाऊबीजच्या तारखा

सुरुवातीला सतत थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे, वजन कमी होणे, उजव्या पोटाच्या भागात वेदना, डोळे आणि त्वचेचा पिवळे होणे, वारंवार मळमळ किंवा उलट्या यांसारखी लक्षणे दिसू लागतात. या आजाराची लागण झाल्यावर पोट फुगणे, पाय फुगणे, अशक्तपणा, रक्तस्त्राव यांसारख्या समस्या देखील उद्भवतात. या लक्षणांचा इतर आजारांसोबत गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे खूप महत्त्वाचं आहे.

लवकर केलेले उपचार परिणामकारक ठरतात आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. तज्ज्ञांच्या मते, लिव्हर कॅन्सर टाळण्यासाठी काही उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. यात अल्कोहॉल आणि धूम्रपान टाळणे, हेपाटायटिस B ची लस घेणे, आरोग्यदायी आहार राखणे, तळलेले पदार्थ टाळणे, नियमित व्यायाम करणे, आणि लिव्हरचे वेळोवेळी आरोग्य तपासणे यांचा समावेश होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Symptoms of liver cancer
Liver Disease Symptoms: रात्री १ ते ३ दरम्यान जाग येतेय? असू शकतो लिव्हरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com