Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Diwali 2025: दिवाळी २०२५ मध्ये पाच शुभ राजयोग तयार होत आहेत. या योगांमुळे चार राशींच्या लोकांना संपत्ती, यश, आणि समृद्धीचा लाभ होणार आहे. पाहा, तुमची रास त्यात आहे का?
Diwali Powerful Rajyogs
Diwali 2025 Astrologygoogle
Published On

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी सुंदर लाईटिंगने दिव्यांनी सजावट करतात. मग लक्ष्मी पूजन करतात. जेणेकरून जास्तीत जास्त संपत्ती आणि समृद्धी मिळावी. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी दिवाळीच्या वेळेस ग्रह अशा शुभ स्थितीत आहेत की एकच नव्हे तर पाच राजयोग तयार होणार आहेत.

यंदा २०२५ मध्ये दिवाळीच्या दिवशी शुक्रादित्य राजयोग, हंस महापुरुष राजयोग, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग आणि कलात्मक राजयोग बनत आहेत. ज्योतिषशास्त्रात या राजयोगांना अत्यंत शुभ मानले जाते. या पाच राजयोगांमुळे चार राशींच्या लोकांची दिवाळी अत्यंत समृद्धीची आणि लाभाची होणार आहे.

Diwali Powerful Rajyogs
Navi Mumbai Tourism: फिरण्यासाठी हिल स्टेशन शोधताय? नवी मुंबईपासून ५८ किमीवर वसलंय असं एक ठिकाण, पाहून भुरळ पडेल

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळी करिअरमध्ये सोन्याहून पिवळं होण्याची संधी घेऊन येणार आहे. बोनस, नोकरीतील बढती आणि व्यवसायातील नफा या दिवाळीत लाभदायक ठरणार आहे. अनेक स्रोतांकडून आर्थिक फायदा मिळण्याची योग आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन तेजस्वी, जिज्ञासू आणि मेहनती असते. या दिवाळीत त्यांना नशीबाची भरपूर साथ मिळेल. काही सुवर्णसंधी हाताळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक फायद्यात यश मिळू शकते.

सिंह राशी

सिंह राशीतील व्यक्ती आत्मविश्वासू आणि प्राविण्यपूर्ण असतात. या दिवाळीच्या राजयोगांमुळे त्यांना धनसंपत्ती आणि नवीन संधी मिळतील. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समृद्धी आणि महागड्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीतील व्यक्तींसाठी ही दिवाळी आर्थिक गुंतवणुकीतून फायदा देणारी ठरू शकते. ज्यांनी आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी संघर्ष केला होता, त्यांना आता यश मिळेल. पैशाची कमतरता राहणार नाही, नोकरी करणाऱ्यांना बोनस आणि पगारवाढ मिळेल, तर व्यवसायिकांची कमाई चांगली राहील.

टीप: प्रिय वाचक, ही बातमी फक्त माहितीच्या उद्देशाने दिली आहे. आम्ही यासाठी सार्वजनिक स्त्रोतांचा आधार घेतला आहे.

Diwali Powerful Rajyogs
Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com