
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट
पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे आहेत?
मिस्ड कॉल देऊन चेक करा पीएफ बॅलेन्स
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमधील रक्कम ही एक गुंतवणूक असते. तुमच्या पगारातील एक ठरावीक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केली जाते. पीएफ खात्यात काही रक्कम नियोक्त्याकडून जमा केली जाते. दरम्यान, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा आहे हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.
मिस्ड द्या अन् पीएफ बॅलेंस चेक करा (PF Balance Check Through Call)
तुम्हाला जर पीएफ खात्यातील बॅलेंस चेक करायचा असेल तुम्ही एक मिस्ड कॉल देऊन करु शकतात. तुम्हाला 9966044425 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे पीएफची सर्व माहिती मिळणार आहे. तुम्ही या नंबरवर कॉल केल्यावर आपोआप फोन कट होईल. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल.
SMS द्वारे मिळवा माहिती
तुम्ही एसएमएसद्वारेही पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे चेक करु शकतात. तुम्हाला 7738299899 या फोनवर EPFOHO असं लिहल्यानंतर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला एसएमएसवर पीएफ खात्यातील बॅलेन्स किती आहे हे समजेल.
तुम्ही उमंग अॅप किंवा ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनदेखील माहिती मिळवू शकतात. तुम्हाला फक्त वेबसाइटवर जाऊन यूएएन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. पीएफ बॅलेन्स, पासबुक हे सर्व दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.