
ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
आता एटीएम किंवा यूपीआयमधून काढता येणार पीएफचे पैसे
कधीपासून सुरु होणार सेवा?
ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक डिजिटल सेवा सुरु होणार आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार आहेत. याची प्रोसेस मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, आता कर्मचाऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओची ही सेवा जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे.
ईपीएफओमधून आता एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहे. जूनमध्येच ही सेवा सुरु होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा अजूनही सुरु झाली नाही. दरम्यान, २०२६ च्या सुरुवातीलाच ही सेवा सुरु केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या पुढच्या बेठकीत यावर चर्चा होईल. या बैठकीत ईपीएफओबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. याच बैठकीत एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल, असं सांगण्यात येत आहे.
ईपीएफओ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची पुढची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्यासाठी इन्फ्रास्टक्चर तयार केले आहे. यामध्ये ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी पीएफ विड्रॉलची लिमिट सेट करेन. याबाबत अजून कोणताही निर्णय आलेला नाही. दरम्यान, या सुविधेमुळे जवळपास ७ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे.
ईपीएफओ सदस्यांना होणार फायदा
याआधी ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन ऑफलाइन अर्ज करावा लागायचा. यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे जमा होण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागायची. मात्र, आता सरकारच्या या निर्णर्यामुळे अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.