PF Account: तुमचा PF अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह तर नाही ना? आताच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठं नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्मचारी भविष्य निधी

सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निधी (EPF) वर ८.२५% वार्षिक व्याजदर निश्चित केला आहे. हे व्याज दरमहा तुमच्या EPF खात्याच्या क्लोजिंग बॅलन्सवर मोजले जाते, परंतु ते वर्षातून एकदाच तुमच्या खात्यात जमा होते.

Pf | yandex

ईपीएफ अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह

जर तुमचे ईपीएफ अकाउंट ३६ महिन्यांपर्यंत इनअ‍ॅक्टिव्ह असेल तर यावर व्याज मिळतो का, जाणून घ्या.

Pf | yandex

पीएफ अकाउंट कधी इनअ‍ॅक्टिव्ह होतो?

EPFOच्या नियमानुसार, जर तुमचे EPFअकाउंटमध्ये ३ वर्ष म्हणजेच ३६ महिन्यांपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नाही तर अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह होतो.

Pf | yandex

अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह

जर तुम्ही ५५ वर्षामध्ये रिटायर होत असाल तर ५८ वर्षापर्यंत तुमचे अकाउंट अॅक्टिव्ह मानले जाईल. त्यानंतर हे अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह होईल.

Pf | ai

नोकरी

जर तुम्ही नोकरी बदलली तर अकाउंट ट्रान्सफर करुन घ्या. जर तुम्ही कोणतीही नोकरी करत नसाल तर अकाउंटमधून पैसै काढून घ्या. EPFOच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवरुन तुम्ही तुमच्या अकाउंटच्या स्थितीबद्दल जाणून घेऊ शकता.

Pf | yandex

व्याज मिळणार नाही

EPFOने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, जर ईपीएफ अकाउंटमध्ये ३६ महिन्यापर्यंत ट्रान्सफर किंवा विड्रावल केले नाही तर अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह होईल आणि त्यावर व्याज मिळणार नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या जुन्या अकाउंटमधून नवीन अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करुन घ्या.

Pf | yandex

EPFO 3.0

EPFO लवकरच आपल्या EPFO 3.0 लॉंच करणार आहे. या नवीन प्लॅटफॉर्मचा उद्देश क्लेम प्रोसेसिंग जलद करणे तसेच डिजिटल फिचर्स जसे की, UPIद्वारे विड्रावलची सुविधा देणे आहे.

Pf | google

NEXT: किडनीला हेल्दी ठेवण्यासाठी प्या 'या' ड्रिंक्स

Kidney | Saam Tv
येथे क्लिक करा