ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किडनी आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव आहे, याला निरोगी ठेवण्यासाठी कोणते पेय फायदेशीर ठरतात जाणून घ्या.
शरीराला आवश्यक पुरेसे पाणी पिणे देखील किडनीला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे किडनीतील विषारी पदार्थ निघून जातात.
नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम असते. जे किडनीसाठी फायदेशीर असतात.
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे किडनीला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
लिंबू पाणी वजन कमी करण्यासोबत किडनीसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये सिट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. म्हणून लिंबू पाणीचे सेवन केले पाहिजे.
डाळिंबाच्या रसामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे किडनीला हेल्दी ठेवण्यास मदत करतात.
कोथिंबीरच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुमधर्म असतात. जे किडनीला निरोगी ठेवतात.