ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एचआयव्ही हा एक धोकादायक विषाणू आहे जो आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमकुवत करतो. वेळेवर उपचार न केल्यास, हा आजार एड्समध्ये बदलू शकतो, जो आणखी गंभीर आहे.
एचआयव्ही रुग्णांना निरोगी राहण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
एचआयव्ही रुग्णांनी कच्चे मांस, कच्ची अंडी किंवा कमी शिजवलेले अन्न खाऊ नये.
याशिवाय फळे आणि भाज्या व्यवस्थित धुतल्याशिवाय खाऊ नयेत.
एचआयव्ही रुग्णांनी दारू किंवा सिगारेटचे सेवन करू नये.
एचआयव्ही रुग्णांनी स्वच्छ पाणी प्यावे, जसे की फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी सर्वोत्तम आहे.
एचआयव्ही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, ते धोकादायक ठरू शकते.