ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कर्नाटकातील हाय-टेक शहरांपैकी बंगळुरु हे एक अतिशय महत्वाचे शहर आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
जर तुम्ही कर्नाटकला फिरण्यासाठी जासत असाल तर बंगळुरु जवळच असलेल्या सुंदर हिल स्टेशनला भेट द्यायला विसरु नका.
बंगळुरुजवळील नंदी हिल्स हे हिल स्टेशनबद्दल स्वर्गाहूनी सुंदर आहे.
तुम्ही येथे ढगांनी वेढलेले डोंगराचे नयनरम्य दृश्य पाहू शकता. तुम्हाला येथे ढगांमध्ये चालल्यासारखे वाटेल.
नंदी हिल्सचे अद्भुत दृश्य पाहून तुम्हाला क्षणभर स्वर्गात आल्यासारखे वाटेल.
नंदी हिल्सचे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला खूप आकर्षित करेल. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
बंगळुरुपासून नंदी हिल्स ६१.३ किलोमीटर अंतरावर आहे.