EPFO
EPFO Saam Tv

EPFO: नोकरी सोडली तर किती दिवसात पीएफचे पैसे काढायचे? EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

EPFO Update News: पीएफ खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जातात. पीएफ खात्यात पैसे जमा केले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होईल. सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत पैसे काढावेत असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
Published on

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. हे अकाउंट ईपीएफओद्वारे चालवले जाते. या खात्यात दर महिन्याला तुमच्या पगारातील काही रक्कम जमा केली जाते. कर्मचारी आणि नियोक्त्याकडून हे पैसे जमा केले जातात. दरम्यान, दर महिन्याला जर पैसे जमा केले नाही तर तुमचे अकाउंट इनअॅक्टिव्ह होऊ शकते.

EPFO
EPFO Pension Update : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! EPFOने बदलले नियम, 'या' कामगारांनाही मिळणार पेन्शन

ईपीएओने आता याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांची ५८व्या वर्षी निवृत्ती होते. दरम्यान, निवृत्तीनंतर पीएफ खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जात नाही. त्यामुळे तुमचे अकाउंट इनअॅक्टिव्ह होणार का, तुमच्या अकाफंटमधील पैशांचं काय होणार असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

६१ वर्षापर्यंत मिळणार व्याज

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही ५८ व्या वर्षी रिटायर होत असाल तर तुम्हाला पुढील तीन वर्ष म्हणजे वयाच्या ६१ वर्षापर्यंत व्याज मिळते. हे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातात.

६१ व्या वर्षी पैसे काढावे

जर तुम्ही ६१ वर्षानंतरही पैसे ठेवले तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. यानंतर तुम्हाला व्याज मिळणार नाही. त्यामुळे वयाच्या ६१ वर्षाआधीच पैसे काढावेत.जर तुम्ही हे पैसे काढले नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतात. याबाबत ईपीएफओने सविस्तर व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. तुम्ही epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन व्हिडिओ पाहू शकतात.

EPFO
PF Account: तुमचा PF अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह तर नाही ना? आताच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठं नुकसान

PF साठी ऑनलाइन क्लेम कसा करायचा?

तुम्ही पीएफसाठी ऑनलाइन क्लेम करु शकतात.

यासाठी तुमचा UAN नंबर सक्रिय असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबरदेखील सक्रिय असावा.

आधार डिटेल्स सर्वकाही ईपीएफओ डेटाबेसमध्ये असावे.

याचसोबत बँक अकाउंट, आयएफएससी ईपीएफओशी लिंक असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन क्लेम करता येणार आहे.

EPFO
EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com