Manasvi Choudhary
लाडकी बहीणींची दिवाळी गोड होणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याची सुरूवात आजपासून होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे १५०० रूपये आजपासून येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता E-KYC अपडेट करणे महत्वाचे असणार आहे.
पुढील २ महिन्यात सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
http://ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC करता येणार आहे.
या संकेतस्थळावर तुम्हाला आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे यानंतर एक कॅप्चा येईल तो टाकायचा आहे.
यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, रेशनकार्ड माहिती, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड नंबर ही माहिती अपडेट करायची आहे. या प्रक्रियेमध्ये महत्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे.
आधार लिंक झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईत तो टाकून अपडेट बटणावर क्लिक करायचं आहे.