वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

Thackeray Sena vs BJP Union Clash: वरळीमध्ये ठाकरेसेना आणि भाजपमध्ये राडा झालाय. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा वाद कोणत्या वळणावर जाणार?
Workers of Thackeray Sena and BJP clash inside Mumbai’s St Regis Hotel during a dispute over forming a new union.
Workers of Thackeray Sena and BJP clash inside Mumbai’s St Regis Hotel during a dispute over forming a new union.Saam Tv
Published On

ही धुमचक्री कुठल्या आखाड्यातली नाही... तर भाजप आणि ठाकरेसेनेतील हा तुफान राडा झालाय तो वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये...गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल सेंट रेजिसमध्ये ठाकरेसेनेची युनियन कार्यरत आहे..... मात्र आता भाजपनं सेंट रेजिस हॉटेलमध्ये युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत बॅनर लावला... आणि तिथंच वादाची ठिणगी पडली...ठाकरेसेनेनं थेट भाजपचं पोस्टर फाडून टाकलं...

ठाकरेंच्या कामगारसेनेनं भाजपचा बॅनर फाडून टाकल्यानं मोठा तणाव निर्माण झाला... मात्र भाजप सत्तेचा गैरवापर करुन घुसखोरी करत असल्याचा आरोप ठाकरेसेनेनं केला...

फक्त सेंट रेजिसच नाही तर ठाकरेंच्या कामगारसेनेची ताकद कुठे ताकद आहे पाहूयात....

पंचतारांकित हॉटेल

विमानतळ

शासकीय आणि निमशासकीय संस्था

MTNL

बँकिंग क्षेत्र

विमा कंपन्या

रुग्णालये

खाजगी कंपन्या आणि कुरिअर सर्व्हिसेस

मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शक्तीस्थळावरच घाव घालण्याची रणनीती आखलीय.. आधी वांद्र्यातील ताज लँड्स एंड आणि आता सेंट रेजिसमध्ये झालेला राडा याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे..

हॉटेल्स आणि एअरपोर्ट ही ठाकरे गटाची ताकद मानली जाते. मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेसेनेनं नेमके हेच ठिकाणं लक्ष्य करायला सुरुवात केलीय... त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप -शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना संघर्ष आणखी तीव्र होणार हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com