Child Health : ताप-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, १५ वर्षांचा मुलगा थेट व्हेंटिलेटरवर, वाचा डॉक्टर काय म्हणाले...

Health Emergency : लहान मुलांच्या ताप, खोकला आणि वजन घटण्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. एका 15 वर्षांच्या मुलाला टीबीमुळे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.
Fever and Cough Warning
Child Health Emergencygoogle
Published On

लहान मुल आजारी पडलं की पालकांना खूप टेन्शन येतं. कारण लहान मुलं त्यांना होणाऱ्या वेदना स्पष्टपणे सांगत नाहीत. कधीकधी त्यांना शरीरात होणाऱ्या वेदनांबद्दल माहितीही नसते. अशावेळेस त्यांची तळहाताच्या फोडा प्रमाणे काळजी घेणे गरजेचे असते.

लहान मुलांना मुळात संसर्गामुळे लगेचच आजाराची लागण होऊ शकते. कारण त्यांच्या इम्यून सिस्टीमची चांगल्या प्रकारे वाढ किंवा ग्रोथ झालेली नसते. त्यांना १ दिवस जरी थंड पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी त्यांना सर्दी-खोकला, ताप अशा समस्या जाणवतात. तर मुलं खूप धावपळ करत असतात. त्यामुळे त्यांच्या वजनातही फरक जाणवतो. पण काही वेळेस पालकांनी मुलांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. कसं ते पुढील लेखात स्पष्टपणे जाणून घेऊयात.

Fever and Cough Warning
Pear Benefits: रोज १ पेर खाल्याने या ४ समस्या होतील कायमच्या दूर

तज्ज्ञांच्या मते, सामान्य लक्षणातूनच मोठ्या जीवघेण्या आजारांची लागण होते. हे एका धक्कादायक घटनेतून समोर आलं आहे. क्षयरोगासारखा (टीबी) आजार अजूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि वेळेवर उपचार न झाल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो.

डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, 15 वर्षांचा मुलगा इमर्जन्सी रूममध्ये गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. गेल्या एका महिन्यापासून त्याला सतत ताप, खोकला आणि वजन कमी होण्याची समस्या जाणवत होती. मग त्याला दोन दिवसांत श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. कुटुंबीयांना हा त्रास नॉर्मल वाटल्यामुळे घरगुती उपचार त्यांनी सुरु केले होते. मात्र लक्षणे कमी होण्याऐवजी वाढत गेली.

रुग्णालयात दाखल झाल्यावर मुलाची स्थिती खूप गंभीर झाली होती. हृदयाचे ठोके खूप वेगाने धडधडू लागले होते आणि ऑक्सिजन पातळी खूपच कमी होती. अवघ्या तासाभरात त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तपासणीत फुफ्फुसांचा क्षयरोग ( Pulmonary Tuberculosis TB )आढळून आला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलांच्या कोणत्याही आजारांकडे दुर्लक्ष करणं पालकांसाठी धोक्याचं ठरू शकतं.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Fever and Cough Warning
Moringa Benefits: शेवग्याची पानं खा अन् तंदुरुस्त राहा, केसांपासून ते अपचनापर्यंतच्या समस्या होतील दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com