Moringa Benefits: शेवग्याची पानं खा अन् तंदुरुस्त राहा, केसांपासून ते अपचनापर्यंतच्या समस्या होतील दूर

Drumstick Leaves: रोज शेवग्याची पाने चावून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, हृदय निरोगी राहते आणि त्वचा-केसांसाठी नैसर्गिक फायदा होतो.
Daily Chewing Drumstick Leaves
Moringa Leaves Health Benefitsgoogle
Published On

प्रत्येकाच्या घरात हिरव्या पालेभाज्या बनतात. पण आवडीने कोणीच खात नाही कारण त्याची चव इतर भाज्यांपेक्षा वेगळी असते. पण शेवग्याची भाजी अनेकांच्या आवडीची असते. शेवग्याच्या शेंगाची भाजी तर बऱ्याच घरात दर आठवड्यालाही बनवून खाल्ली जाते. पण जितक्या शेंगासोबत शेवग्याची पाने सुद्धा चवीला उत्तम लागतात. तुम्ही ही भाजी घरच्या घरी बनवून खाऊ शकता. पुढे आपण याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला उत्तम हेल्दी आरोग्य जगण्यासाठी होऊ शकतो.

आयुर्वेदात शेवग्याच्या झाडाला एक चमत्कारी झाड म्हटलं जातं. आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये शेवग्याच्या पानांचा वापर शतकानुशतकं केला जात आहे. जीवनसत्त्वं, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. ज्याचा फायदा शरीराला मोठ्या प्रमाणात होत असतो. जाणून घेऊया रोज शेवग्याची पानं चावून खाल्याने शरीराला किती फायदा होतो.

Daily Chewing Drumstick Leaves
WhatsApp Tips: WhatsApp हॅक होऊ नये म्हणून लगेचच ऑन करा या 8 सेटींग्स

1. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गजन्य आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. त्याने व्हायरल ताप, सर्दी- खोकल्यापासून बचाव होतो.

2. पचनक्रिया सुधारते

रोज शेवग्याची पानं चावून खाल्याने पचन एन्झाईम्स अॅक्टीव्ह होतात. त्याने बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि अपचनासारख्या तक्रारींवर नैसर्गिकरित्या आराम मिळतो.

3. हृदयाचे आरोग्य सुधारते

शेवग्याच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फ्लॅव्होनॉईड्स असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तसेच अनेक गंभीर लक्षणांपासून तुम्ही दूर राहता.

4. ऊर्जा आणि ताकद वाढवते

लोह, कॅल्शियम आणि आवश्यक पोषक घटकांमुळे शरीरातील थकवा कमी होतो. रोज खाल्याने ऊर्जा आणि स्टॅमिना दोन्हीची वाढ होते.

5. त्वचा आणि केसांना होणारा फायदा

शेवग्याची पानं त्वचा उजळ ठेवायला मदत करतात. तसेच केस गळण्याच्या समस्याही कमी होतात. इतकंच नाही तर जे लोक कमी वयात वृद्धांसारखे दिसतात. त्यांच्यासाठी ही पानं कोणत्याही महागड्या उपचारापेक्षा योग्य आहेत. दररोज काही शेवग्याची ताजी पाने चावून खाणं हा आरोग्य सुधारण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय आहे. मात्र आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Daily Chewing Drumstick Leaves
Womens Jewellery: मकरसंक्रातीला बायकोसाठी खरेदी करा 'ही' बजेट फ्रेंडली खास भेटवस्तू, पाहा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com