Sakshi Sunil Jadhav
आजच्या डिजिटल युगात WhatsApp प्रत्येकाकडे असते आणि आपली सगळी माहिती त्यामध्ये असते. पण यामध्ये सायबर स्कॅम्सला सामोरं जाण्याची भिती अनेकांच्या मनात असते. म्हणूनच पुढच्या मोबाईलमध्ये सेटींग्स आत्ताच ऑन करा.
WhatsApp मधले Privacy Checkup या फीचरमुळे प्रोफाइल फोटो, स्टेटस, About, Last Seen आणि Online स्टेटस यांची मर्यादा आपण ठरवू शकतो.
Disappearing मेसेज यामध्ये सायबर स्कॅम्सला सामोरं जाण्याची भिती अनेकांच्या मनात असते. म्हणूनच पुढच्या मोबाईलमध्ये सेटींग्स आत्ताच ऑन करा.
Disappearing या फीचरमुळे 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांनंतर मेसेज आपोआप डिलीट होतात. यामुळे चॅट हिस्ट्री मर्यादित राहते आणि डेटा लीकचा धोका कमी होतो.
Two-Step Verification हे अकाउंट हॅकिंगपासून वाचवणारे सर्वात महत्त्वाचे फीचर आहे. यामध्ये PIN आणि ईमेल आयडी सेट केल्यावर अकाउंटवर तुमच्या परवानगी शिवाय कोणालाही तुमची प्रोफाइल दिसत नाही.
App Lock मुळे फिंगरप्रिंट, Face ID किंवा टच आयडी वापरून WhatsApp लॉक करता येतं. Chat Lockच्या मदतीने खास चॅट्स वेगळ्या सुरक्षित फोल्डरमध्ये ठेवता येतात.
अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज ब्लॉक करण्याचा यामध्ये ऑप्शन असतो. IP अॅड्रेस प्रोटेक्शन आणि लिंक प्रीव्ह्यू बंद करून फिशिंगपासून बचाव होतो.
या फीचरमुळे चॅटमधील मीडिया ऑटो डाउनलोड बंद करता येतो. चॅटचा डेटा WhatsApp बाहेर शेअर होण्यावरही मर्यादा घालता येते.
Read Receipts बंद केल्याने समोरच्या व्यक्तीला मेसेज वाचल्याचं कळत नाही. यामुळे प्रायव्हसी वाढते, मात्र ग्रुप चॅटवर हा पर्याय लागू होत नाही.