Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली अन् दिली UPSC; IPS अरीबा नोमान यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IPS Areeba Nomaan: अरीबा नोमान यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आपल्या मामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मोठ्या जिद्दीने सरकारी अधिकारी झाल्या.

Siddhi Hande

यश मिळवायचे असेल तर एकच मार्ग आहे ते म्हणजे मेहनत. प्रचंड मेहन आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होतात. असंच यश अरीबा नोमान यांनादेखील मिळाले आहे. अरीबा मेमान यांनी आपल्या मामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने यूपीएससी परीक्षा दिली आणि त्या आयपीएस झाल्या आहेत.

अरीबा नोमान या मूळच्या उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील नॅशनल इन्श्युरन्स कंपनीत मॅनेजर आहेत. अरीबा यांची आई गृहिणी आहेत. त्यांनी १०वी पर्यंतचे शिक्षण स्टेला मॉरिस कॉन्वेंट स्कूलमधून केले. त्या सुरुवातीपासूनच टॉपर होत्या. (Success Story)

१०वीनंतर अरीबा आपल्या मामा गुफरान अहमद यांच्यासोबत दिल्लीला आल्या. दिल्लीत येणे हा त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट होता.अरीबा यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बीटेक केले. त्यानंतर त्यांना मल्टीनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळाली. त्या नोकरी करत होत्या.

अरीबा आपल्या मामाची खूपच लाडकी होती. त्यांची एक इच्छा होती की, अरीबाने यूपीएससी परीक्षा द्यावी. ग्रॅज्युएशननंतर त्यांना नोकरी मिळाली होती. परंतु तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.अरीबा या सुट्ट्यांसाठी सुलतानपूरला आपल्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांची भेट तात्कालीन SDM प्रमोद पांडेय यांच्याशी झाली. तेव्हा त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अरीबा यांनी यूपीएससी परीक्षेत १०९ वी रँक मिळवली.त्या सध्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Success Story Of Areeba Noman)

अरीबा नोमान यांनादेखील अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. अपयश आले तरीही त्यांनी नेहमी स्वतः वर विश्वास ठेवला. ईमानदारीने प्रयत्न केले.त्यांना दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या मुख्य परिक्षेत अपयश मिळाले. परंतु तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT