Success Story:डॉक्टर झाले, ५ लाखांच्या पगाराची नोकरी धुडकावली अन् दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात धीरज कुमार सिंह झाले IAS

Success Story Of IAS Dhiraj Kumar Singh: धीरज कुमार सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी ५ लाखांच्या पगाराची नोकरी धुडकावली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा ही फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. देशातील अनेक तरुणांचे आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न असते. असंच स्वप्न धीरज कुमार सिंह यांनीदेखील पाहिलं आणि ते पूर्ण केले.

आयएएस धीरज कुमार सिंह यांनी एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पदवी प्राप्त करुन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी धुडकावली आणि यूपीएससी परीक्षा दिली. (IAS Dhiraj Kumar Singh Success Story)

Success Story
Success Story: १४व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी पदरात दोन मुले, जिद्द सोडली नाही, IPS झाल्या, वाचा प्रेरणादायी प्रवास

धीरज कुमार सिंह हे अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी सुरुवातीला हिंदी माध्यमातून शिक्षण केले. त्यानंतर १२वीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.डॉक्टर डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांनी एमडी पदवीदेखील प्राप्त केली.

धीरज कुमार सिंह हे मूळचे गोरखपूरचे रहिवासी. त्यांची वडिल शहरात कामानिमित्त राहायचे तर आई गाव असायची. त्या काळात त्यांची आई खूप आजारी होती.त्यावेळी त्यांच्या वडिलांना ट्रान्सफर मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. (UPSC Success Story)

आयएएस धीरज कुमार सिंह यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांनी घरी जेव्हा यूपीएससी परीक्षा द्यायची असे सांगितले तेव्हा घरातून खूप विरोध झाला. परंतु त्यांनी आपला निर्णय ठाम ठेवला. सिविल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी त्यांनी ५ लाख रुपये पगाराची नोकरी धुडकावली. (Success Story Of IAS Officer)

Success Story
Success Story: १४व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी पदरात दोन मुले, जिद्द सोडली नाही, IPS झाल्या, वाचा प्रेरणादायी प्रवास

धीरज कुमार सिंह यांनी स्वतः ला एकच संधी देण्याचे ठरवले. ते जर पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले असते तर ते पुन्हा डॉक्टर म्हणून काम करणार होते. परंतु त्यांच्या मेहनतीला यश आले. त्यांनी २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ६४ रँक मिळवली.आज ते आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Success Story
Success Story: 12th फेल, भिकारींसोबत झोपले, शिपाई म्हणून काम केले; चौथ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS मनोज कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com