Success Story: नोकरी सोडली अन् सुरु केला कॅब सर्व्हिसचा व्यवसाय; आज उभारली ६० कोटींची कंपनी; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

Success Story Of Businessman Vikram Bhosale: सांगलीच्या विक्रम भोसले यांनी नोकरी सोडून कॅब सर्व्हिसचा बिझनेस सुरु केला. आज या कंपनीची नेटवर्थ ६० कोटी रुपये आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात अनेकदा परिस्थितीमुळे काही गोष्टी कराव्या लागतात. कितीही मनासारख काम नसलं तरीही ते करावं लागतं. परंतु कधीतरी आपले स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या मिळते. तेव्हा त्या संधीचं सोनं करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. असंच काहीसं सांगलीच्या विक्रम भोसले यांच्यासोबत झाले. (Success Story)

Success Story
Success Story: १०वी, १२वीत टॉपर, इंजिनियरिंगसोबत केला UPSC चा अभ्यास; पहिल्याच प्रयत्नात यश; IAS सृष्टी देशमुख यांचा प्रेरणादायी प्रवास

विक्रम भोसले हे मूळचे सांगलीतील दिघंची आटपाटी गावचे रहिवासी. त्यांनी पुण्यात ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा मोटर्स, बजाज मोटर्स या कंपन्यांमध्ये ऑटोमोबईल इंजिनियरिंग केले. त्यांनी नोकरी करताना स्वतः ची कार घ्यायचा निर्णय घेतले. कारसाठी द्यायला लागणाऱ्या ईएमआयमुळे त्यांनी टुरिस्ट कार घेतली. शनिवार-रविवारी ते स्वतः भाडे घेऊन गाडी चालवायचे आणि इतर दिवशी ड्रायव्हर ठेवून भाड्याने द्यायचे. (Success Story Of VRB Technologies Owner)

या बिझनेसमध्ये असलेला स्कोप त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी अजून एक कार घेतली. त्यानंतर या कार वाढवून ओला आणि उबर कंपन्यांच वेंडरशिप घेतली. २०१६ साली त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी पुण्यात VRB Technologies Pvt.Ltd नावाची कंपनी सुरु केली.

त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेटमध्ये प्रवेश केला. विविध कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कारची आवश्यकता असते. त्यामुळे विक्रम यांनी कंपन्यांना कॅब सर्व्हिस देण्याचा निर्णय घेतला.

Success Story
Success story: आर्मी ऑफिसरची लेक, परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, अन् तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; अंबिका रैना यांचा प्रेरणादायी प्रवास

आज विक्रम यांच्या पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली अशा अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ५०० पेक्षा जास्त कार आहेत. त्यातील ५० पेक्षा जास्त कॅब या स्वतः च्या आहेत.या कंपनीचा टर्नओव्हर २२ कोटी आहे. या कंपनीची नेटवर्थ आज ६० कोटी रुपये आहे. मराठमोळ्या विक्रम भोसले यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. (Success Story Of Vikram Bhosale)

Success Story
Success Story: महाबळेश्वरपेक्षा गोड स्ट्रॉबेरी अकोल्यात, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com