Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मार्चमध्ये १५०० आले नाही, एप्रिलमध्ये ३००० रुपये येणार का?

Majhi Ladki Bahin Yojana April Month Installment Update: लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. दरम्यान, ज्या महिलांना मार्चचा हप्ता आलेला नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. या योजनेत महिलांना आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे अनेक महिला निराश आहेत. दरम्यान, आता या महिलांना दोन्ही महिन्याचे ३००० रुपये येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला अपात्र आहेत त्यांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना यापुढचा एकही हप्ता दिला जाणार नाही. दरम्यान, जर काही तांत्रिक अडचणींमुळे महिलांना पैसे आले नसतील तर ते या महिन्यात येऊ शकतात. अशा महिलांच्या खात्यात ३००० रुपये येण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाहीत पैसे (These Women Will Not Get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेत या महिन्यातदेखील काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. या महिन्यातदेखील काही महिलांच्या अर्जांची पडताळणी होत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. याआधी ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

एप्रिलचा हप्ता या तारखेला येणार

लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला येण्याची शक्यता आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे दिले जातात. त्यामुळे या वेळीही शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात.शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया आहे. त्यामुळे त्या मूहूर्तावर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT