Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

viral joota churai video clever trick: लग्नातील शूज लपवण्याच्या परंपरेत नवरीच्या बहिणीने वराचे बूट लपवण्यासाठी लढवलेली भन्नाट शक्कल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मजेशीर व्हिडीओवर युजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
viral joota churai video clever trick
viral joota churai video clever tricksaam tv
Published On

आजकाल सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच लग्नातील एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतोय. लग्नांमध्ये नवऱ्याचे शूज लपवण्याची एक गमतीशीर परंपरा असते. यामध्ये रस्मीत वधूच्या बहिणी किंवा मैत्रिणी वराचे बूट चोरून त्या पैसे मागतात.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका नवऱ्याचे शूज लपवण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून युजर्सना हसू आवरत नाहीये. या व्हिडीओमध्ये नवरीच्या बहिणीने वराचे बूट लपवण्यासाठी लढवलेली शक्कल जबरदस्त असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये वर मंडपात बसलेला दिसतोय. यावेळी तो एका लिफाफ्यात पैसे ठेवून बायकोच्या बहिणींना देतोय. त्याचे शूज आधीच बहिणींनी लपवलेले असतात. पाहुण्यांना बहिणीने मंडपाच्या जवळच शूज लपवल्याचा अंदाज असतो. मात्र खरा ट्विस्ट इथेच येतो. नवऱ्याच्या बहिणीने नवऱ्याचे बूट दुसरीडे कुठेही लपवले नसतात. तर ते तिने स्वतःच्या पायात बांधून ठेवलेले असतात.

viral joota churai video clever trick
Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

तिने लढवलेल्या या शक्कलमुळे शूज शोधणाऱ्यांना कितीही प्रयत्न करूनही ते सापडत नाहीत. शेवटी पैसे मिळाल्यानंतर नवरीची बहिण हसत बूट परत करते आणि पुढील विधी सुरू होतात.

viral joota churai video clever trick
धावत्या बसने घेतला पेट, भरवस्तीत घुसली; प्रवाशांचे सामान- दुकानं अन् घरं जळून खाक, VIDEO व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @HasnaZaruriHai या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. सुमारे 19 सेकंदांच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळालेत. यावर लोकांनी विविध कमेंट्स करून मेव्हणीचं कौतुक केलंय.

viral joota churai video clever trick
Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

युझर्सने पाडला कमेंट्सचा पाऊस

सोशल मीडियावर या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. एका युजरने लिहिलंय की, नवरीची बहिण खूपच हुशार आहे. तर अजून एका व्यक्तीने कमेंट केलीये की, इतकं खतरनाक टॅलेंट शोधूनही सापडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com