Railway Recruitment: खुशखबर! १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; १००७ रिक्त जागा; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत तब्बल १००७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Railway Job
Railway JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या भरती सुरु आहे. रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्यासाठी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्रता फक्त १०वी पास आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती होऊन तुम्हाला खूप काही शिकयला मिळणार आहे.

Railway Job
NTPC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC मध्ये १८२ पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

जर तुम्ही फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. तुम्ही रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.तुम्हाला secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वेत एकूण १००७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०१५ निश्चित करण्यात आली आहे.

रेल्वेतील (Railway Recruitment)या नोकरीसाठी नागपुर डिवीजनसाठी ९१९ पदे रिक्त आहेत. वर्कशॉप मोतीबागमध्ये ८८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.

Railway Job
Bank Jobs: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; १५८ रिक्त पदांवर भरती; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. १०वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही SECR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करा.

Railway Job
Government Job: सरकारी नोकरीची संधी; कृषी विद्यापीठात भरती निघाली; पगार ८१००० रुपये; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com