Manasvi Choudhary
अनेकांना पत्नीशी नेमके कसे वागावे याचे भान नसते यामुळे पती- पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. यासाठी चाणक्यांनी ७ मोलाचे सल्ले दिले आहेत.
चाणक्य म्हणतात की पती-पत्नींनी एकमेकांवर आपले हक्क सांगण्यास कधीही लाजू नये. यामुळे त्यांचे नाते केवळ मजबूत होणार नाही तर त्यांच्यातील प्रेमही वाढेल.
तुमच्या पत्नीला कोणतीही स्वत:मधील भीती किंवा कमकुवतपणा सांगू नका. असे केल्याने ती तुमच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते आणि तुमचा आत्मविश्वास कमी करू शकते.
जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तुमच्या पत्नीला त्याबद्दल सांगू नका. ती भावनिक प्रतिक्रिया देऊ शकते, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.
जर पतीचे पूर्वी प्रेमसंबंध असतील तर त्याने ते पत्नीला सांगू नये. यामुळे वैवाहिक जीवनात संशय आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे विश्वास. तुमच्या पत्नीचा विश्वास कधीही तोडण्याचा प्रयत्न करू नका.