Ladki Bahin Yojana Update google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल; 'या' योजनांसाठी सुरू झाली अर्जांची लाट

Women applying for Shravanbal scheme after Ladki Bahin closure : लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्यानंतर राज्यातील हजारो महिलांनी श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेकडे मोर्चा वळवला आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana latest update : ईकेवायसीनंतर राज्यातील ८० लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद झाला आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे नियम आणि निकष बदलल्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांनी आता शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे.

६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. यावर उपाय म्हणून महिलांनी 'लाडकी बहीण' बंद झाल्याचे प्रमाणपत्र (NOC) मिळवत, इतर शासकीय योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे तहसील कार्यालयांमध्ये 'श्रावणबाळ' आणि 'निराधार' योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अचानक प्रचंड वाढली आहे.

सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलेल्या महिलांची संख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामधील हजारो महिलांनी आता 'श्रावणबाळ' आणि 'निराधार' योजनेसाठी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्यची एनओसी (NOC) घेण्यासाठी महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली आहे. हे प्रमाणपत्र हातात पडताच शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज केले जात आहे. महिलांच्या या नव्या शक्कलेने सरकारी तिजोरीवरील भार वाढणारच आहे.

लाडकी बहीण योजनेत ईकेवायीनंतर सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार ५३० महिलांचे वय ६५ वर्षांवर असल्याचे आढळले आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त, अशा सुमारे एक लाख १३ हजार लाडक्या बहिणी समोर आल्या. त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे त्या ६५ वर्षांवरील वृद्ध व एकाच कुटुंबातील दुसरी-तिसरी लाडकी बहीण जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून लाभ बंद झाल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) घेत आहेत. त्या पुढे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करीत आहेत, असे समोर आले आहे. राज्यातही हीच परिस्थिती असल्याचे समजतेय.

राज्य सरकारच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी राज्यातील अनेक महिला अर्ज करत आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून लाभार्थीस दरमहा १५०० रुपये मिळतात.

० ते ६५ वर्षांखालील महिला, तरुणींना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये (दिव्यांग लाभार्थीसाठी ५० हजार रुपये उत्पन्नाची अट आहे) असणे आवश्यक आहे. या योजनेतूनही लाभार्थीस दरमहा १५०० रुपयेच (दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये) मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरेगाव भीमा आठवडा बाजारात पुन्हा चोरट्यांचा डाव फसला; दोन सराईत अटक

Shocking : तरुणीचा भाओजीवर जीव जडला, लग्नाच्या ३ दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं; सियानंतर उर्मिलाचं हादरवणारं कृत्य

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनचा थरार! मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू; प्रसिद्ध व्यापाऱ्याला अटक

वाढीव वीजबिलांवर मनसे आक्रमक! २ हजार तक्रारींसह महावितरणला इशारा

गावरान पद्धतीची पाथरीची भाजी, एकदा खाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT