Skin Care: महागडे टोनर नको! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी तयार करा गुलाबपाणी; त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो

Shruti Vilas Kadam

घरच्या घरी गुलाबपाणी कसे तयार कराल?

ताज्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवा. त्या पाण्यात मंद आचेवर उकळा. पाकळ्यांचा रंग फिका झाल्यावर पाणी गाळून थंड करा आणि स्वच्छ बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.

Besan And RoseWater Facepack | GOOGLE

त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो

गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने ठेवते आणि नियमित वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

Rose water | yandex

डाग आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत

गुलाबपाण्यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसते.

Rose Water toner | Canva

नैसर्गिक टोनर म्हणून करा वापर

चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या मदतीने गुलाबपाणी लावा. यामुळे त्वचेचा pH संतुलित राहण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश वाटते.

Rose water | yandex

उन्हाळ्यात त्वचेला मिळतो थंडावा

फ्रिजमध्ये ठेवलेले गुलाबपाणी चेहऱ्यावर स्प्रे केल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि घामामुळे आलेला चिकटपणा कमी होतो.

Rose Water Benefits

संवेदनशील त्वचेसाठीही उपयुक्त

शुद्ध आणि घरगुती गुलाबपाणी सौम्य असल्याने अनेकांच्या संवेदनशील त्वचेसाठीही उपयुक्त ठरू शकते. मात्र, प्रथम पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

Rose Water Benefits

वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

गुलाबपाणी तयार करताना स्वच्छ भांडी आणि शुद्ध पाणी वापरा. ते नेहमी फ्रिजमध्ये साठवा आणि काही दिवसांत वापरून संपवा, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकून राहील.

Rose Water For Hair

Daily Walnut Benefits: फक्त 4-6 अक्रोड रोज खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त फायदे

Daily Walnut Benefits
येथे क्लिक करा