Shruti Vilas Kadam
तज्ज्ञांच्या मते, दररोज ४ ते ६ अक्रोड खाणे पुरेसे ठरते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात आणि अतिरिक्त कॅलरीही टाळता येतात.
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते.
अक्रोडमधील हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मर्यादित प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी खनिजे असतात. ही हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास त्यातील पोषक तत्त्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. तसेच ते पचायलाही सोपे पडतात.
अक्रोडमधील व्हिटॅमिन ई, बायोटिन आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवण्यास तसेच केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.