Manasvi Choudhary
पावसाळ्यात संध्याकाळी काही हलकं, फुलकं खायचं असेल तर तुम्ही गरमा गरम भजी खाऊ शकता. नेहमीची तीच कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा.
ओवा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कुरकुरीत ओव्याची भजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
ओवा भजी बनवण्यासाठी ओव्याची ताजी पाने, बेसन पीठ. तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, हिंग, आले- लसूण पेस्ट, तेल, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.
ओव्याची भजी रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. पाने धुतल्यानंतर ती एका सुती कापडाने पूर्णपणे पुसून घ्या.
एका भांड्यात तांदुळ पीठ,बेसन पीठ मिक्स करा. नंतर त्यात हळद, लाल मसाला, हिंग, ओवा, आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
आता या मिश्रणात ओव्याची पाने मिक्स करा. पीठात थोडेसे पाणी मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये ओव्याची भजी कुरकुरीत फ्राय करा.