

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना गुंगी गुडिया म्हणत हिनवले आहे. यावरून सत्ताधऱ्यांकडून काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्ला चढवलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही कोणी विचारत नाही त्यामुळे न्यूज मध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचं काम चाललेल आहे. 'बदनाम हुए तो क्या हुवे नाम तो हुवा अशा पद्धतीने यांची कारवाई चाललेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचं फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.