Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय करताय? डॉक्टरांनी सांगितल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Shruti Vilas Kadam

अंडरआर्म्स काळे का पडतात?

वारंवार शेव्हिंग, जास्त घर्षण, घाम, डेड स्किन, हार्मोनल बदल, लठ्ठपणा किंवा काही वैद्यकीय समस्या यांमुळे अंडरआर्म्सचा रंग गडद होऊ शकतो.

Dark Underarms Tips

प्रत्येक घरगुती उपाय सुरक्षित नसतो

लिंबू, बेकिंग सोडा किंवा टूथपेस्टसारखे उपाय सोशल मीडियावर लोकप्रिय असले तरी ते प्रत्येकाच्या त्वचेसाठी सुरक्षित असतीलच असे नाही.

Dark Underarms Tips

लिंबाचा जास्त वापर टाळा

लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल (Acid) असते. संवेदनशील त्वचेवर त्याचा थेट वापर केल्यास जळजळ, लालसरपणा किंवा त्वचेची आग होऊ शकते.

Dark Underarms

बेकिंग सोड्याचा अति वापर हानिकारक

बेकिंग सोडा त्वचेचा नैसर्गिक pH बिघडवू शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज येणे किंवा इरिटेशन होण्याचा धोका वाढतो.

Dark Underarms Home Remedies | Saam Tv

सौम्य एक्सफोलिएशन आणि मॉइश्चरायझिंग महत्त्वाचे

आठवड्यातून १ ते २ वेळा सौम्य एक्सफोलिएशन करा आणि त्यानंतर चांगले मॉइश्चरायझर वापरा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होते.

Dark Underarms Home Remedies

योग्य हेअर रिमूव्हल पद्धत निवडा

वारंवार शेव्हिंगमुळे त्वचेवर घर्षण वाढू शकते. शक्य असल्यास त्वचेला योग्य ठरणारी हेअर रिमूव्हल पद्धत निवडा आणि नंतर त्वचेची काळजी घ्या.

Dark Underarms Home Remedies

डॉक्टरांचा सल्ला घ्या

अंडरआर्म्सचा काळेपणा अचानक वाढत असेल किंवा इतर लक्षणांसह दिसत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य उपचारांमुळे समस्या नियंत्रणात येऊ शकते.

Dark Underarms Home Remedies

Daily Walnut Benefits: फक्त 4-6 अक्रोड रोज खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त फायदे

Daily Walnut Benefits
येथे क्लिक करा