Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना

Pune Police: पुण्यामध्ये नणंद-भावजयमध्ये टोकाचा वाद झाला. या वादातून भावजयने नणंदेच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक टाकलं. बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना
Pune CrimeSaam Tv
Published On
  • पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले

  • नणंद-भावजय वादातून बाळावर हल्ला

  • लोहगावमध्ये कौटुंबिक वादातून भयंकर घडलं

  • पुणे पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील लोहगाव परिसरात एका कौटुंबिक वादाने धक्कादायक वळण घेतल्याची घटना घडली. घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेवीक्विक टाकण्यात आले. नणंद- भावजयच्या वादातून ही घटना घडली. या घटनेनंतर बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव परिसरात मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली. कौटुंबिक वादातून अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतण्यात आले. याप्रकरणी अल्ताफ नबी शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना ३१ जुलै रोजी पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्ती भागात घडली होती.

Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना
Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

फिर्यादी अल्ताफ यांची पत्नी जैनाब आणि तिची भावजय सानिया शेख यांच्यात काही कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी सानिया शेखने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत कुणालाही माहिती दिली किंवा पोलिसांत फिर्याद दिली तर जीवे मारण्याची धमकी आरोपी सानियाने दिली.

Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना
Beed Crime: बीड हादरले! वकिलावर लोखंडी रॉड अन् दगडाने हल्ला, हॉटेल मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा

तसंच इतर दोन आरोपींनी देखील फिर्यादीला सानियाविरोधात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तातडीने बाळाच्या आईने बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. सध्या या बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तक्रारीनंतर लोहगाव पोलिसांनी सानिया शेखसह इतर २ जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com