Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आठ दिवसांत खात्यात जमा होणार १५०० रुपये, समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana February Installment Date: लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पुढच्या आठ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. दरम्यान, आता हे पैसे लवकरच महिलांना मिळणार आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ दिवसांत जमा होतील, असं अजित पवारांनी सांगितलं होतं.दरम्यान अजूनही पैसे जमा झाले नाहीत. मात्र, आता ८ दिवसांत नक्कीच महिलांना पैसे मिळणार आहेत.

फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील. मागील तीन महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. या महिन्यातही शेवटच्या आठवड्यात पैसे जमा करतील. (Ladki Bahin Yojana)

मार्च महिन्यात ३ तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

२१०० रुपये कधी? (When Will Women Get 2100 Rupees)

विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले जात होते. विधानसभा निवडणूका होऊन तीन महिने झाले आहेत तरीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. हे पैसे कदाचित राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत मोठी घोषणा करु शकतात. या अर्थसंकल्पानंतर कदाचित २१०० रुपये दिले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarees Slim Look Tips: चब्बी मुलींनी साडीमध्ये बारिक दिसण्यासाठी ट्राय करा ७ खास टिप्स, दिसाल सगळ्यांमध्ये उठून

Maharashtra News Live Update: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील कॉटर्सचा ड्रग्स नशा करण्यासाठी होतोय वापर

Child eye cancer: बापरे! 5 वर्षांच्या 20 मुलांना डोळ्यांचा कॅन्सर; वाचा नेमकी लक्षणं काय आहेत?

Weight Loss : ना डाएट, ना औषधं; सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक, ७ दिवसांत वजनात दिसेल फरक

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडकीच्या खात्यात किती रूपये जमा होणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT