CM Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले.
Chhatrapati  Shivaji Maharaj Jayanti
CM Fadnavissaam tv
Published On

महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती साजरी केली जात आहे. आज किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढली जाणार असल्याची घोषणा केलीय.

शिवाजी महाराज यांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरासारखे आहेत. त्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवजन्मोत्सवासाठी आलेल्या नागरिकांना संबोधन करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून ५ वर्षांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची ४०० वी जयंती साजरी करणार आहोत. किल्ले शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर स्वराज्याची स्फुर्ती, तेज मिळते. हेच तेज आणि स्फुर्ती घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असतो.

आता तीच स्फुर्ती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा भारताचा आत्मभिमान जागवण्याचा काम केलं. आज १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचा आत्मभिमानामागे शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्यदैवत असल्याचं फडणवीस म्हणाले.

Chhatrapati  Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजीराजेंसंदर्भातील विकिपिडीयावरील आक्षेपार्ह मजकूर हटवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराजांनी राजकारभार कसा चालवायचं हे सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धे नव्हते तर एक उत्तम प्रशासकदेखील होते. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन आणि इतर व्यवस्थापनाचे जनक शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांना आदर्श राजा, जाणता राजा म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेला सर्व दिल्याने आपण त्यांचे स्मरण कायम करत असतो असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Chhatrapati  Shivaji Maharaj Jayanti
Devendra Fadnavis: दावोसमध्ये जाऊन भारतीय कंपन्यांसोबतच करार का? मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला दिलं उत्तर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले मंदिरांसारखे आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अनेक कामे सुरू केली आहेत. एक टास्क फोर्स स्थापन केली असून त्यातून किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरची अतिक्रमणे हटवली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली.

अनेक राजे आणि राजवाड्यांनी मुघलाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. मुघलांसमोर नतमस्तक होत होते, अशा काळात माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. राज्यातील अत्याचार,मुघलांचा अन्यायकारक जाच मिटवण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराज यांना प्रेरित केलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली आणि अठरा पगड जातीमधील मावळ्यांना सोबत घेतलं. आणि देव, देश धर्माची लढाई सुरू केली होती असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com