

नाशिकमधील IT क्षेत्रातील महिलांच शोषण झाल्याच्या वृत्तावर बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. नक्की घटना माहिती नाही असे सांगताना महिला व बाल कल्याण विभागाची मंत्री म्हणून या प्रकरणात लक्ष घालून कडक कारवाईचे संकेत आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या डहाणू पर्यंत धावणाऱ्या उपनगरी रेल्वेसह गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच वेळा पत्रक पुन्हा विस्कळीत झालंय.
सफाळे येथे लूप वरून निघालेल गुड्स ट्रेनच इंजिन फेल झाल्याने पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत . विरार पासून डहाणू पर्यंत डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झालीये.
पश्चिम रेल्वेची सेवा वीस मिनिटांनी उशिराने... विरार पासून पुढे डहाणू आणि गुजरात कडे जाणाऱ्या ट्रेनचा खोळंबा
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी राबविले कोंबिंग ऑपरेशन.
तब्बल 25 गुन्हेगारांना अटक करून नांदेड शहरातून गुन्हेगारांची काढली धिंड.
तीन दिवसात नांदेड शहरात झाले 5 खून.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची केली धरपकड सुरू
विलेपार्ले मुंबई विमानतळ टर्मिनल एक वर आग लागल्याची घटना
सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज
आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलिस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील तिला अनेक वर्षापासून बंद पडलेल्या या कॉटर्स चा वापर आता ड्रग्स नशा करण्यासाठी वापरला जात आहे. याच भागातील सामाजिक कार्यकर्ते भोसले यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
नांदुरा ते मलकापूर रोडवरील निमखेड फाट्या जवळ आज भीषण अपघात झाला. आटो आणि बाईक यांच्यात झालेल्या जबर धडकेत तब्बल आटो मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.
अपघात इतका भीषण होता की, आटो व बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
सर्व जखमींना उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उमरगा येथे शुल्लक कारणावरून एसटी डेपो च्या वाहतूक नियंत्रकास बूटाणे मारहाण केल्याची घटना घडली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरगायचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या समर्थकांकडून ही मारहाण झाली असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आगारातील वाहतूक नियंत्रण गायकवाड यांना मारहाण करणाऱ्या आमदार प्रवीण स्वामी समर्थकावर कडक कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पासून तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून काही वेळापूर्वी त्यांचे दरे गावामध्ये हेलिकॉप्टरने आगमन झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राड्यानंतर प्रथमच ते दरे गावात आल्यामुळे या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.यावेळी जिल्हा प्रशासनाकडून आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ग्रामसेवक दशरथ देविदासराव गोरे यांना 1 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहात पकडले. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. तक्रारदाराकडून 500 रुपये स्वीकारताना खासगी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे महसूल व पंचायत विभागात खळबळ उडाली असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
- नाशिकमधील IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरण
- कंपनीच्या HR ला पोलिसांकडून अटक
- HR अश्विनी चेननानीला पोलिसांकडून अटक
- महिला कर्मचाऱ्यांनी शोषणा
मुंबईतील कुलाबा सेशन न्यायालयातून पळून गेलेला सराईत आरोपी हरीसर अँथोनी जोसेफ याला अखेर बोळींज पोलिसांनी अटक केली. चहाच्या टपरीवर वाद घालत असताना गस्त पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तोच फरार आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर 20 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून चार वेळा तडीपार करण्यात आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
नाशिक येथील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर महिला अत्याचार आणि संपत्ती बळकावण्याचे 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तातडीने ‘मोक्का’ लावण्याची मागणी अनिल गोटे यांनी केली. धुळे येथे पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासन आणि राजकीय नेत्यांवर टीका करत, या प्रकरणाचा ‘पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग’साठी वापर होत असल्याचा आरोप केला.
विधानसभेच्या राहुरी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी अखेर सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. 30 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 जणांनी माघार घेतली.. त्यामुळे आता प्रमुख दोघांसह सात उमेदवार रिंगणात उरले आहेत.. अक्षय शिवाजी कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह संतोष एकनाथ चोळके ( वंचित बहुजन आघाडी), रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे (सर्व अपक्ष) हे उमेदवार रिंगणात उरले आहेत..
कोल्हापुरात घराच्या रेनोवेशनचं काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने दोघे कामगार अडकले
महाराणा प्रताप चौकातील इथली घटना
कोल्हापूर मनाच्या अग्निशमन विभागाने अवघ्या पंधरा मिनिटात दोघांना सुखरूप काढलं बाहेर
या घटनेत दोघेही किरकोळ जखमी
जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू
आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी आरक्षण बचाव समिती, कल्याण यांच्या वतीने कल्याण तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला आवाज बुलंद केला.
शिवसेना भवनाताल आज गुरुवारी पुरुष आणि महिला पदअधिकारींची बैठक पार पडतेये आहे
मुंबईतले नेते , उपनेते , सचिव आमदार या सगळ्यांचा समावेश आहे.
पहिल्या महिला पदाधिकारींची बैठक होईल आणि त्यानंतर पुरुष पदाधिकारींची बैठक होईल.
यासाठी आता संजय राऊत, आदित्य ठाकरेही पोहचले आहेत.
जालना जिल्हा परिषदेमध्ये आज पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया यांनी पदभार घेताच जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची झाडाझडती घेतली.आरोग्य ,शिक्षण,पाणीपुरवठा विभागासह विविध विभागात जाऊन त्यांनी आढावा घेतला, दरम्यान आज विविध विभागात 3 कर्मचारी गैरहजर असल्याचे लक्षात आले.या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी कनवारीया यांनी म्हटलंय.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागा मार्फत सुतार दवाखाना ते स्वामी विवेकानंद चौक या भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाईचे कामकाज सुरू होते. यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाई झाल्यानंतर नियमाप्रमाणे साहित्य सोडवून घ्या, असे सांगितले. परंतु सामंजस्याची भूमिका न घेता वाद विवाद करत राहिल्याने राज जाधव यांच्या विरोधात अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून कलम १३२, ३५१(२), ३५२ नुसार कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नवले पूल वाहतूक विभागाच्या पोलिस चौकी या ठिकाणी एका मद्यधुंद तरुणाचा एक प्रताप समोर आला आहे. एका तरुणाने दारूच्या नशेत थेट नवले पोलिस चौकीचा दरवाजा ठोठावला तसेच बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला. ही सगळी घटना प्रत्यक्षदर्शीने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिस चौकीच जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचं असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे बारमती पोटनिवडणुकीतून माघार घेतील, असे काँग्रेस प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.
आतापर्यंत २० उमेदवारांनी घेतली बारामती पोटनिवडणुकीतून माघार
एकूण ५५ उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी उरला शेवटचा एक तास
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेससह अपक्ष निवडणूक रिंगणात असणार का याकडे लक्ष
दुपारी ३ वाजता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणा
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेण्यात आली. या भेटीत शिष्ट मंडळाकडून हर्षवर्धन सकपाळ यांना काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली यावेळी सकपाळ यांनी शिष्टमंडळाला या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा करून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.
राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागातून महसूल विभागात तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याने नंदूरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बदलीचा निषेध करत दिव्यांग बांधवांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले आहे. कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष च्या संगठन सृजन अभियान’ अंतर्गत कल्याणमध्ये नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीकरण, आगामी निवडणुकांची तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख नेत्यांची नावे पुढे आली आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामगिरीचा आढावा मांडत पदासाठी दावा केला.
पक्षाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक संघटनेची स्थिती, कार्यपद्धती आणि नेतृत्वाबाबत अभिप्राय घेतला जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी पात्रात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पाच्या नावावर पवना नदी पात्रा जवळील भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल करण्यात आली आहे. चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स समोर पवना नदी पात्रा जवळ मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून त्या ठिकाणी झाडांची कत्तल देखिल करण्यात आली आहे.
माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर बच्चू कडू....
बच्चू कडू यांनी केला प्रवासाचा अनुभव शेअर
40 टक्के प्रवास पूर्ण केला अजून 60 टक्के प्रवास बाकी..
बच्चू कडू हे 3 एप्रिल रोजी भगवतगीता आणि संविधान घेऊन एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर निघाले आहे....
जशी स्पर्धा आकाश आणि पर्वताची आहे तशीच स्पर्धा बेईमानी आणि इमानदारीने जगणाऱ्या लोकांची आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती...
बच्चू कडू सध्या जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर आहेत...
कठीण आणि आव्हानात्मक मार्गावर बच्चू कडू यांची ही अनोखी यात्रा आहे...
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, सुप्रिया सुळे यांची काँग्रेसला विनंती
अजित दादांना श्रद्धांजली म्हणून काँग्रेस ने पोटनिवडणूक बिनविरोध करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी
सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुप्रिया सुळेंनी केली मागणी
अजित दादा यांनी काँग्रेससोबत अनेक वर्ष काम केले असून त्यांच्या नेत्यांशी अनेक वर्ष संबंध होते, त्यामुळे काँग्रेस ने उमेवदार मागे घ्यावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या म्हसोबा वाडीत दाखल.
संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताह निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबा वाडीत दाखल झाले.
त्यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार सुरेश धस व इतर लोकप्रतिनिधी.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहाला महंत विठ्ठल महाराज यांच्या विनंतीवरून उपस्थित राहिले आहे.
बारामतीतून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष यांनी घेतला, दिल्ली हायकामंडला कळवळा जाईल त्यानंतर पुढील निर्णय होईल,
यात ज्यापद्धतीने फोन आला, यावर एकमत महाराष्ट्रमधील नेत्यांच झालं, यात दिल्लीला कळणार
वारंवार विनंती फोन केल्यानं निर्णय घेतला.
अजित दादा यांच्यावर नेता म्हणून आदर होता, हीच भावना बोलून दाखविली, यात हायकामंडचा निर्णय घेतल्यानंतर अंतिम निर्णय होईल, आमच्या मनात असलेले सांगितलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यात अक्षरशः अळ्या आढळून आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याने पिंपरी चिंचवडकरांचा आरोग्य धोक्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तुकाराम नगर परिसरामध्ये महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात अक्षरशः अळ्या आढळून आल्या आहेत.
धाराशिवमध्ये शिक्षकाचा अजब कारनामा;अकरावी पास युवकाकडून विद्यार्थ्यांना शिकवणी
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने थेट अकरावी पास मुलाला शिक्षक म्हणून नियुक्त केल्याचा प्रकार आला उघडकीस
संबंधित शिक्षकाने त्या युवकाला महिन्याला सुमारे 6 हजार रुपये देऊन पहिली आणि दुसरीच्या वर्गांना शिकवण्याची जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे
विशेष म्हणजे हा युवक अधिकृत शिक्षक नसतानाही विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवत असल्याचे आले आहे समोर
अनुसूचित जमाती कल्याण समितीने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाचा दौरा करून आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा,अंगणवाडी आणि रेशन दुकानांची पाहणी केली.
आमदारांच्या दोन गटांनी शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेतला.
यावेळी समितीने शिरवे येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून भोजनाची चव चाखली, तर कोचरा येथे एकाच खोलीचा वापर वर्ग आणि निवासासाठी होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अर्ज मागे घेण्याची शक्यता
वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर अर्ज मागे घेण्याची शक्यता
बारामती पोटनिवडणुकीतून आकाश मोरे यांनी अर्ज भरला होता
राष्ट्रवादीच्या विनंतीला मान देत काँग्रेस अर्ज मागे घेण्याच्या तयारीत
पुणे -
सुप्रिया सुळे यांनी लावला संजय राऊत यांना फोन
माध्यमांशी बोलण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी लावला संजय राऊत यांना फोन
"तुम्ही किती वाजता माध्यमांशी बोलणार? त्यानंतर मी बोलते" असं सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यातील संभाषण
सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यात "लाईव्ह" वरून चर्चा
पुणे -
राष्ट्रवादीकडून आज आकाश मोरे यांची समजूत काढली जाण्याची शक्यता
अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच स्थानिक नेते घेणार आकाश मोरे यांची भेट
आकाश मोरे यांचा मनधरणी करण्याचा करणार प्रयत्न
आज अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस
सोलापूर -
सोलापूर जिल्ह्यातील तीन बेकायदा पुतळा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 19 लोकांना अटक केलीय
माढा तालुक्यातील अंजनगाव येथे पुतळा प्रकरणात 10 आरोपीना पोलिसांनी अटक केलीय
करमाळा तालुक्यातील पुनवर येथे बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या अटकेत
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील अमरावती- परतवाडा महामार्गावर टेम्पोचा ओव्हरटेक करताना झाला अपघात
एक नाहीतर तब्बल दोन गाड्यांना ओहरटेक करताना झाला अपघात
अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी
एका ॲम्बुलन्सच्या ड्रायव्हर ने हा संपूर्ण थरार केला मोबाईल मध्ये कैद
सोलापूर -
उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊस जवळ ओव्हर फ्लो झाले असून, ते पाणी थेट ओढ्यात आले आहे.
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना कारंबा नाका ते भोगाव टोल नाका या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ओढया वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.
मुंबई -
पवईच्या आरे कॉलनी ३ नंबर येथील वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन
सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास बिबट्या वस्तीमध्ये
अरे कॉलनी मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जवळच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लागून असल्यामुळे बिबट्या लोक वस्तीमध्ये
पालघर -
मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या मनोर हद्दीत मध्यरात्री भीषण अपघात.
मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकरची चिल्हार उड्डाणपुलावर एका कंटेनरला मागून जोरदार धडक.
या धडकेत टँकर चालक गंभीर जखमी.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत टँकरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढत त्याला उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात केले दाखल.
नागपूर -
- नारा परिसरात गॅस गोदामात ग्राहकांचा राडा, सिलिंडर डिलिव्हरी मेसेजमुळे संताप
- मोबाइलवर डिलिव्हरीचा मेसेज प्रत्यक्षात सिलिंडर न मिळाल्याने गोंधळ
- २५ ते ३० ग्राहकांना चुकीचा मेसेज, गोदामात धडक देत जाब विचारला
- एचपी गॅसचा डोमेस्टिक गॅस गोदामात ग्राहक संतप्त झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता...
नाशिक -
- भोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल
- सिन्नरच्या मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल..
- माळी बंधूंकडून कवडीमोल भावात घेतली कोट्यवधी रुपयांची जमीन..
- तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी केली बतावणी..
- माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने केली हडप
- याच जमिनीवर नंतर त्याने उभारले ईशानेश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस..
- सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू..
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 29 व 30 मे रोजी धाराशिव येथे होणार आहे.
साहित्य नगरीला ‘लोकनेते अजित पवार साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.
या संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,कवी संमेलनासह विविध कार्यक्रम होणार असून देशभरातून सुमारे 900 साहित्यिक सहभागी होणार आहेत.
नाशिक -
- नाशिकमधील नामांकित कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरण
- ८ पैकी ६ अटकेत तर दोन महिला आरोपी फरार
- नामांकित कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर फरार आणि एक महिला आरोपी फरार
- पीडितांनी महिला ऑपरेशन मॅनेजरकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप
- दोन्ही फरार महिला आरोपींच्या शोधासाठी नाशिक पोलिसांची पथके रवाना
- महिला कर्मचाऱ्यांचं शोषण, मानसिक छळ प्रकरणी नाशिक पोलिसांत आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल
- पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्याकडे SIT ची जबाबदारी
पुणे -
पुणे मेट्रोच्या बोगद्याला पडलेल्या खड्डा प्रकरणी न्यायालयाने घर मालकाचा अर्ज फेटाळला
परवानगीविना स्थानकाजवळ केलं होतं बोअरवेलचं काम
घरमालकासह ठेकेदाराचा जामिन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला
मंडई स्थानकाजवळ सुरू असलेल्या बोअरवेलच्या कामामुळे थेट मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्याने पाणीगळती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होईल असे केल्याच सांगत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
बीड -
मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक
सरपंच पदासाठी उद्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी दाखल करणार आपला उमदेवारी अर्ज
आश्विनी देशमुख उद्या सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने सकाळी 11.00 वा.दाखल करणार
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त झाले होते
नवीन सरपंचांचा कालावधी 18 महिने इतका असणार आहे
नाशिक -
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
- नाफेड आणि NCCF करणार कांद्याची आगाऊ खरेदी
- नाफेड आणि NCCF करणार प्रत्येकी १ लाख टन कांद्याची खरेदी
- पुढील काही दिवसातच बफर स्टॉकसाठी दोन्ही संस्थांकडून कांदा खरेदीला सुरुवात होणार
- केंद्रीय मंत्री गटाच्या बैठकीत निर्णय झाल्याची केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाची माहिती
- दरवर्षी मे, जून महिन्यापासून होणारी कांदा खरेदी यंदा एप्रिलपासूनच करण्यात येणार
बुलडाणा -
खामगावात कामगार विभागाचा बेजबाबदारपणा
भांड्यांसाठी रात्रभर महिलांच्या रांगा, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या गावीच नियोजनाचा फज्जा
शेकडो महिला रस्त्यावर, प्रशासन झोपेत!
अहिल्यानगर -
निवडणूक याचिका फेटाळली; खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा
अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील विजयावर दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली
यामुळे खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे.
डॉ. सुजय विखे यांनी 2024 च्या निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत ही याचिका दाखल केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.