Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार फक्त ५०० रुपये? कारणही आलं समोर

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना फक्त ५०० रुपये मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा होत आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. यामध्ये लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahin yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin February Installment: लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे मिळणार की नाही?

मिडिया रिपोर्टनुसार, आता काही लाडक्या बहि‍णींना फक्त ५०० रुपये हप्ता मिळू शकतो. ज्या महिलांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेत १००० रुपये मिळतात.त्यामुळे या लाभार्थ्यांना दर महिन्याला केवळ ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांचे अर्ज बाद केले आहेत.काही महिलांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत. जवळपास साडेपाच लाडक्या बहि‍णींना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १५०० ऐवजी ५०० रुपये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ५ लाख महिला अपात्र, आता कोणाला मिळणार नाही लाभ, नवीन नियम काय?

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता पुढील आठवड्याभरात येणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत. परंतु अद्याप लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी झालेली नाही. अर्जांची पडताळणी झाल्यानंतर महिलांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहेत. पाच टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. त्यामुळे महिलांचा हप्ता लांबणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी, आता प्रत्येक वर्षाला द्यावी लागणार कागदपत्रे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com