Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही; कारणही आलं समोर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, मराठवाड्यातील तब्बल ५५ हजारांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद होणार आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: साडेपाच लाख महिलांना फेब्रुवारीचा हफ्ता मिळणार नाही; कारण आलं समोर, वाचा

मराठवाड्यातील २१ लाख ९७ हजार २११ पैकी ५५ हजार ३३४ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर ५४ हजार ५९८ अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही.

विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागातून २३ लाख ७ हजार १८४ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील २१ लाख ९७ हजार २११ अर्ज वैध ठरले. ५४ हजार ५९८ अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी, आता प्रत्येक वर्षाला द्यावी लागणार कागदपत्रे

आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच हयातीचा दाखलादेखील महिलांना द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील.

छत्रपती संभाजी नगरमध्ये 6655 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.धाराशिवमध्ये 2533 महिला अपात्र ठरल्या आहेत. लातूरमध्ये 8001 तर जालन्यात 9622, हिंगोलीत 5825 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. परभणीत 2802,बीडमध्ये 9364 तर नांदेडमध्ये 10532 महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : भाजपच्या 'लाडक्या' सदस्य, भाजपच्या टार्गेटवर योजनांचे लाभार्थी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com