NTPC Recruitment: इंजिनियर झालात? NTPC मध्ये सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करायचा?

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ४०० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
NTPC Recruitment
NTPC RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एनटीपीसीमधील अकाउंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

NTPC Recruitment
Central Bank Jobs: सेंट्रल बँकेत अधिकारी होण्याची संधी; पगार ८५९२०; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि मेडिकल चेकअपनंतर केली जाणार आहे.

सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे. ४०० रिक्त पदांवर ही भरती केली जात आहे. तुम्हाला ऑलाइन अर्ज करायचे आहे. भारतात कुठेही तुम्हाला नोकरीसाठी बोलावले जाऊ शकते.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलेले असावे.

NTPC Recruitment
Job News: अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम WWW.ntpc.co.in या वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर करिअर सेक्शनमध्ये EET-2025 भरती यावर क्लिक करा.

यानंतर भरती मोहिमेत अर्ज करा. तुम्ही तुमची माहिती, शैक्षणिक माहिती भरा. यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर अर्जाची स्लीप डाउनलोड करा.

NTPC Recruitment
Bank Jobs: बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

पंजाब अँड सिंध बँकेत भरती

सध्या पंजाब अँड सिंध बँकेत भरती सुरु आहे. बँकेत १०० पेक्षा जास्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

NTPC Recruitment
Government Job: वनविभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५०,००० रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com