
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळेच 45 हजार कोटींची ही योजना पुढेही सुरु ठेवण्याची कसरत सरकार करतंय. आता आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपची लाडकीवरच मदार आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सदस्य करुन घेण्याची भाजपची रणनीती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना तसं टार्गेटच दिलंय. याशिवाय नमो शेतकरी महासन्मान योजना आणि आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांनाही पक्षाचं सभासद करुन घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलंय. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. यावरुन विरोधक आक्रमक झालेत. ही योजनाच राजकीय हेतूनं आणली, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. मात्र विरोधकांच्या टीकेनंतर बावनकुळेंनी सारवासारव केली.
राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, असा निर्धारही बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर केलाय. त्यासाठी राज्यभरात भाजपचे प्राथमिक सदस्य करुन घेण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. आणि त्यामुळेच भाजपची नजर आता विविधी योजनांच्या लाभार्थ्यांवर असल्याची चर्चा आहे. कोणत्या योजनेचे किती लाभार्थी आहेत ते पाहूयात.
लाडक्या बहिणी भाजपच्या सभासद?
- भाजपचं सभासद लक्ष्य
1 कोटी 51 लाख
- लाडकी बहीण लाभार्थी
2 कोटी 20 लाख
- मोफत कृषी पंप योजना लाभार्थी
40 लाख
मुंबई, पुणे, नाशिक या राजकीयदृष्ट्य महत्वाच्या पालिका जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवले आहे. त्यासाठी स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरु केली आहे. सदस्य करुन लाडकी बहिणींची साथ मिळावी यासाठी भाजपची धडपड सुरु आहे. विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुकीतही लाडक्या बहिणींची माया भाजपवर कायम राहणार का ते पाहणे महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.