Beed Politics : स्वस्त खतांचं पार्सल कुणी रोखलं? धनजंय मुंडेंचा मोठा स्कॅम असल्याचा अंजली दमानियांचा आरोप

Dhananjay Munde Anjali Damania : कृषी खात्यातला घोटाळा धनंजय मुंडेंची पाठ सोडायला तयार नाही. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी दमानियांनी ऑनलाईन खतांची ऑर्डर दिली होती. मात्र ही ऑर्डर त्यांच्या घरी पोहचण्यापूर्वीच रोखण्यात आली. नेमकी ही ऑर्डर कुणी रोखली? कोण आहे याच्यामागे? पाहूयात विशेष रिपोर्ट.
Dhananjay Munde Anjali Damania
Dhananjay Munde Anjali DamaniaSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा हा संताप आहे अ‍ॅग्रो-बिग्रो या ई-कॉमर्स कंपनीविरोधात. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता. एवढंच नाही तर मुंडेंचा पर्दाफाश करण्यासाठी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, स्प्रेअर पंपाची ऑनलाईन ऑर्डर दमानियांनी दिली होती. मात्र ऑर्डर मिळण्याच्या अवघ्या काही मिनिटं आधी ही ऑर्डर कंपनीने परत घेतली. मोठ्या स्कॅमचा पर्दाफाश होणार असल्यामुळे ही ऑर्डर थांबवल्याचा आरोप करत दमानियांनी धनंजय मुंडेंवरच निशाणा साधलाय.

दमानियांच्या आरोपानंतर इफ्को कंपनीने स्पष्टीकरण दिलंय. ई-कॉमर्स कंपन्यांना इफ्को कंपनीची उत्पादनं विकण्याचा अधिकार नसल्याचा दावा केलाय..

दमानियांच्या आरोपांवर इफ्कोचं स्पष्टीकरण

- कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही

- काही प्लॅटफॉर्म ही उत्पानं अनधिकृतरित्या विकतात

- एफसीओ परवाना किंवा IFFCO चा ओ फॉर्म नसलेल्या संस्थेस इफ्कोच्या खतविक्रीस मनाई

- कुणी बेकायदेशीर विक्री केल्यास कायदेशीर कारवाईचा इफ्कोला अधिकार

तर इफ्कोच्या स्पष्टीकरणानंतर मुंडेंनीही दमानियांवर पलटवार केलाय..

- ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5-10 बॉटल खरेदी करुन डिस्काऊंट देतात

- संबंधित कंपन्यांना इफ्कोकडून नोटीसा

- दमानियांनी सांगितलेल्या अ‍ॅग्री बिग्री कंपनीने वादात येण्यापेक्षा उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली

- कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरुन अशी विक्री बंद होत नसते, हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे

- अर्धवट ज्ञान धोक्याचे असते ते चांगल्या माणसाला तोंडावर पाडते

Dhananjay Munde Anjali Damania
Maharashtra Politics : 'बालाजी किणीकर खोटे सचिन तेंडुलकर, शिंदे त्यांची कधीही विकेट पाडतील'

अंजली दमानियांच्या दारातून परत गेलेल्या स्वस्त खतांचं पार्सल हे मुंडेंच्या सांगण्यावरुन परत गेलं की इफ्कोकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीने? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dhananjay Munde Anjali Damania
Suresh Dhas : संजय राऊत इंटरनॅशनल स्पीकर, त्यांच्यावर बोलण्याइतकी माझी...; सुरेश धसांचा टोमणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com