Maharashtra Politics : 'बालाजी किणीकर खोटे सचिन तेंडुलकर, शिंदे त्यांची कधीही विकेट पाडतील'

Shivsena Politics : 'मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर' असे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटले होते. या विधानावर ठाकरे गटाच्या राजेश वानखेडे यांनी भाष्य केले आहे. किणीकरांवर टीका करताना वानखेडे यांनी शिंदेंचा उल्लेख देखील केला.
Shivsena Politics in ambernath
Shivsena Politics in ambernathSaam Tv
Published On

अजय दुधाने, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ambernath Politics : अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी रविवारी माजी नगरसेवक संदीप लोटे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती लावली होती. या स्पर्धेदरम्यान त्यांनी 'मी आऊट होणार प्लेयर नाही. मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे', असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरुन ठाकरे गटाच्या राजेश वानखेडे यांनी टोला लगावला आहे.

बालाजी किणीकरांच्या 'मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर' या वक्तव्यावर 'बालाजी किणीकर हे नकली सचिन तेंडुलकर आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांचे अंपायर आहेत. त्यांनी बोट वर केलं तर कधीही यांची विकेट जाईल' असे वक्तव्य राजेश वानखेडे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये किणीकर यांच्या विरोधात राजेश वानखेडे उभे राहिले होते. किणीकर यांनी वानखेडेंचा पराभव केला होता.

रविवारी क्रिकेट स्पर्धा सुरु असताना बालाजी किणीकर यांनी संदीप लोटे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'लोटे परिवाराने क्रिकेटचा खेळ ठेवला हे बरं झालं. असाच बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा. कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे. पण मी आऊट होणार खेळाडू नाही. मी अंबरनाथचा सचिन आहे.'

Shivsena Politics in ambernath
Operation Tiger : 'सगळे टायगर आमच्याकडेच, गेले ते कुत्रे-मांजर..' ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

बालाजी किणीकर यांनी टोलेबाजी करताना कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे हे सगळं कोणाला उद्देशून होत याची चर्चा अंबरनाथमध्ये सुरु झाली होती. त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या राजेश वानखेडे यांनी किणीकरांवर टीका केली आहे. या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरामध्ये राजकारण तापत असल्याचे म्हटले जात आहे.

Shivsena Politics in ambernath
Ratnagiri News : रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार, पाच नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com