Operation Tiger : 'सगळे टायगर आमच्याकडेच, गेले ते कुत्रे-मांजर..' ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

Operation Tiger in Maharashtra : राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनमुळे अनेक नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. या ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाच्या नेत्यावर भाष्य केले आहे.
Mission Tiger Eknath Shinde
Mission Tiger Eknath ShindeSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

कोकणात माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली. अनेक नेते, पदाधिकारी राजीनामा देत ठाकरे गट सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी ठाकरे गटाने डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा आहे. या प्रकरणावर वसंत मोरे यांनी भाष्य केले आहे.

ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना ऑपरेशन टायगरसंबंधित प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी 'पुण्यात ऑपरेशन टायगर काही नाही, सगळे टायगर आमच्याकडेच आहेत. गेले ते कुत्रे-मांजर होते', असे विधान केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुकामध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील असे म्हटले.

ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे वसंत मोरे यांच्या स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, 'महापालिका, नगरपालिका निवडणूका एप्रिल किंवा मे महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आम्ही निवडणूका निहाय बैठका बोलावल्या आहेत.'

Mission Tiger Eknath Shinde
Nashik Politics: पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने

'गेल्या वेळेस आमचे १३८ उमेदवार लढले होते. त्याच जागांवरच्या तयारीचा आढावा आज आणि उद्या घेणार आहोत. महापालिकेत कामकाजाची पद्धत काय असते, कार्यकर्त्याने कधी कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलावे या सगळ्या संदर्भातील आमची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी होईल की नाही हा वरिष्ठाचा निर्णय आहे. जर आघाडी झाली तरी आम्ही आमच्या तयारीने ५० टक्के जादगा मागू अन्यथा आमच्या स्वबळाच्या जागा लढवण्यासाठी तयार राहू', असे वक्तव्य वसंत मोरे यांनी केले आहे.

Mission Tiger Eknath Shinde
Ajit Pawar Health News: उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडली, दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com