Maharashtra Politics : कक्षावरून महायुतीचं 'आरोग्य' बिघडलं? शिंदेंचा फडणवीसांवर कुरघोडीचा प्रयत्न?

Mahayuti Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय केलंय शिंदेंनी आणि कोणती समांतर व्य़वस्था उभी करण्याची त्यांची रणनीती आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Mahayuti News : राज्यात नवं सरकार येऊन अडीच महिने उलटले..मात्र मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे फडणवीसांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत असंच दिसतंय. आधी प्रति वॉररुम तयार करुन शिंदेंनी फडणवीसांना धक्का दिला होता आता शिंदेनी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उभालाय. यामुळे मात्र महायुतीचं आरोग्य बिघडल्याची चर्चा रंगू लागलीय.

केवळ उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच तयार करण्यात आला नसून आता मुख्यमंत्र्यांच्या सीएसआर फंडावरच शिंदेगटानं दावा सांगितलाय. यावरुन महायुतीत वादाला सुरुवात झालीये. वादाला कारण ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष म्हणजे काय पाहुयात.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत व्यवस्थापन

- तत्कालीन मुख्यमंत्री स्वत: या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची देखरेख आणि नियंत्रण पाहतात

- निधीतील रक्कम अपघातग्रस्त, आजारी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि गरजूंना मुख्यमंत्री वाटप करतात

- गरजूंना 5 लाखांपर्यंत मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अनेक गरजूंवर आजवर उपचार झाले. आजवर अनेक मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिल्याचे अनेक दाखलेही दिले जातात. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील थेट जनतेशी संपर्क राहणाऱ्या सहाय्यता कक्षा सारखाच प्रतिकक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयार केल्यानं आता वादाचा नवा अंक महायुतीत सुरु झालाय.

Maharashtra Politics
Beed Politics : स्वस्त खतांचं पार्सल कुणी रोखलं? धनजंय मुंडेंचा मोठा स्कॅम असल्याचा अंजली दमानियांचा आरोप

मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदेंनी गरजू रुग्णांना मोठी मदत केली होती. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ७५० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले. तसंच गरजू रुग्णांना २७० कोटींची रेकॉर्डब्रेक मदत केली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी जर उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तयार केला तर त्याचा फायदाही सामान्यांनाच होणार आहे. मात्र जनतेचं आरोग्य सुधारताना महायुतीचं आरोग्य तर बिडघणार नाही ना? अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झालीय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : 'बालाजी किणीकर खोटे सचिन तेंडुलकर, शिंदे त्यांची कधीही विकेट पाडतील'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com