Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मित्रांकडून प्रेरणा घेत सुरु केली UPSCची तयारी, सलग ४ वेळा अपयश, IPS वैभव बँकर यांचा प्रवास

Success Story Of IPS Vaibhav Banker: आयपीएस वैभव बँकर यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांना अनेकदा अपयश आले तरीही त्यांनी हा मानली नाही.

Siddhi Hande

IPS वैभव बँकर यांचा प्रवास

सलग चारवेळा अपयश तरीही हार मानली नाही

मित्रांकडून प्रेरणा घेत दिली UPSC

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) दरवर्षी परीक्षा होते. यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, असं म्हणतात. त्यामुळे अपयश आल्यानंतर कधीच खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. असंच काहीसं वैभव बँकर यांच्यासोबत झालं. परीक्षेत अपयश आले तरीही कधी हार मानू नये, हे आयपीएस वैभव बँकर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

वैभव हे मूळचे अहमदाबादचे रहिवासी आहेत. यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीत आले होते. ते जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा त्यांचे मित्र यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे मित्रांकडून प्रेरणा घेत त्यांनीदेखील यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आहे.

वैभव हे खूप मेहनती आहेत. त्यांनी पहिल्या प्रयत्नात प्रिलियम्स परीक्षादेखील पास केली नव्हती. त्यांचे मनोबल कमी झाले होते. परंतु त्यांनी पुन्हा पुढच्या वेळी मन लावून अभ्यास केला. यानंतर ते पुन्हा अहमदाबादला शिफ्ट झाले. त्यांनी घरी राहून सिविल सर्व्हिसचा अभ्यास सुरु केला.

वैभव यांना दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा अपयश मिळाले. तिसऱ्या प्रयत्नातदेखील ते अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले परंतु चौथ्या प्रयत्नातदेखील पदरात अपयशच आले. परंतु त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.याचाच परिणाम असा की त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आणि ते आयपीएस अधिकारी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pixel 8a वर मिळवा 22000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, आताच खरेदी करा

Manoj jarange patil protest live updates: आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही- उच्च न्यायालय

३ वाजेपर्यंत मैदान खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर.. हाय कोर्टाचा मराठा आंदोलकांना थेट इशारा

Methi Ladoo: मेथीचा पौष्टिक लाडू कसा बनवाल? 'ही' ट्रिक वापरा, कडवटपणा होईल दूर

Nanded- Pandharpur Express : नांदेड - पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोड स्टेशनवर थांबा; प्रवाशांची होणार सोय

SCROLL FOR NEXT