Success Story: गरोदर असताना दिली प्रिलियम्स, बाळ झाल्यानंतर १७ दिवसांतच UPSC मेन्स; मिळवली 45रँक; आता होणार IAS

Success Story of Malvika G Nair: आयआरएस मालविका जी नायर यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४५ रँक मिळवली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे. यूपीएससी परीक्षेत मालविका जी नायरने ४५ रँक मिळवली आहे. मालविका यांनी एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. मालविकाचा प्रवास फक्त तरुण पिढी नव्हे तर सर्व आईंनादेखील प्रेरित करणारा आहे. आई झाल्यानंतर १७ दिवसांतच त्यांनी यूपीएससी मेन्स परीक्षा दिली आहे.

मालविका जी नायर (Malvika G Nair) या मूळच्या केरळच्या रहिवासी आहेत. त्यांनी याआधी दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. त्या आयआरएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्या सध्या चाइल्ड केअर लिव्ह म्हणजेच सुट्टीवर आहेत. त्यांचे पतीदेखील आयपीएस ऑफिसर आहेत.

Success Story
Success Story: चार वर्षांची तयारी, १२ तासांची मेहनत; IIT टॉपर रमेश सूर्या तेजाची प्रेरणादायी कथा

मालविका जी नायर यांनी आपले पती आणि कुटुंबाच्या मदतीने हे यश मिळवलं आहे. त्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर १७ व्या दिवशीच यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले. त्या लवकरच आयएएस ट्रेनिंग पूर्ण करतील आणि कार्यरत होतील.

मालविका जी नायर या मूळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील चेंगन्नूरच्या रहिवासी आहेत. त्या याआधी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. आयएएस होण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्याचा हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता. त्यांनी या संधीचं सोनं केलं.

Success Story
Success Story: लाँड्रीचालकाच्या कष्टाचं सोनं! पोरानं UPSC केली क्रॅक; सरकारी अधिकारी होणार

यूपीएससीच्या मेन्स परीक्षेच्या काळात त्या प्रेग्नंट होत्या. त्यांनी ३ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाला जन्म दिला अन् २० सप्टेंबर रोजी त्यांनी यूपीएससी मेन्स परीक्षादेखील दिली. प्रेग्नंट असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यांना यशदेखील मिळाले.

Success Story
Success story: माझी आई, माझे कान आणि आवाज आहे! कर्णबधीर असूनही जिद्दीच्या जोरावर रत्नाकर यांनी गाठलं यशाचं शिखर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com