Success story: माझी आई, माझे कान आणि आवाज आहे! कर्णबधीर असूनही जिद्दीच्या जोरावर रत्नाकर यांनी गाठलं यशाचं शिखर

Success story: मनात जिद्द असेल तर व्यक्तीला कोणीही ठरवलेली गोष्ट साध्य करण्यापासून रोखू शकत नाही. असंच उदाहरण म्हणजे रत्नाकर. कर्णबधीर असूनही त्यांचा प्रेरणादायी प्रवास तु्म्हाला भारावेल.
Success story
Success storysaam tv
Published On

'रत्नाकर' या शब्दाचा मराठीतील अर्थ जसा 'समुद्र' आहे, तसाच त्याचा अर्थ खजिना, खनिन्यांचे भांडार असाही आहे. समाजाप्रती बांधीलकी जपण्याचा खजिना ज्यांनी जपला ते रत्नाकर शेजवळ नावाप्रमाणेच 'रत्नाकर' आहेत. जन्मतः कर्णबधीर म्हणजेच श्रवणक्षमता कमी आहेत. समोरच्याच्या ओठांच्या हालचालीवरून त्यांना बोलणं समजतं. आपल्या या जन्मजात दिव्यांगत्वावर रत्नाकर यांनी जिद्दीने मात केली आहे. कानाने ऐकू आले नाही तरी, अतिशय सकारात्मक दृष्टीने आयुष्याचे आव्हान पेलणाऱ्या रत्नाकर यांनी M.A. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

लहानपणी त्यांना सायकल चालवायला कार आवडत होती. ती आवड जपता जपता सायकलच्या प्रवासासारखे त्यांचे आयुष्यही गतीमान झालं आहे. धावपटू ते सायकलिस्ट असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे. केल्याने देशाटन, मनुजा येते शहा‌णपण' या उक्तीप्रमाणे सायकलप्रवासामुळे अनेक माणसे, अनेक अनुभव यांनी त्यांचे आयुष्य समृद्ध केले आहे.

Success story
Farmer Success Story: जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तरूण शेतकरी हरला नाही, 10 एकरात केली शेती, ३ बहिणींची लग्नेही केली

नाशिक रोडवरील रेल्वे मेल कार्यालयात ने कार्यरत आहेत. सायकलिंग आणि अॅथॅलिटीक्स क्रीडाक्षेत्रात भारतीय डाक विभागाकडून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली आहे. नाशिक सायकलिस्ट फांउडेशनचे ते क्रियाशीत सभासद आहेत. आखिल भारतीय पोस्टल सायकल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व त्यांनी एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल चौदा वेळा केले आहे. त्याचप्रमाणे दहा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धांमधे सुवर्ण रजत आणि कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही रत्नाकर यांनी सहभाग घेतला आहे. सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

अनेक उल्लेखनीय सायकल स्पर्धाच्या मोहिमा त्यांनी हाती घेतल्या आहेत. सायकल प्रवासाच्या माध्य‌मातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शांती सद्‌भावना सायकल यात्रा, (पंढरपूर ते घुमान-पंजाब), अहमदनगर ते बांगलादेश सद्‌भावना यात्रा, पानीपत ते नाशिक साहसी सायकलिंग क्रीडा स्पर्धा, मनाली ते लेह-भारतीय स्वातंत्र्यदिन - अमृत महोत्सवी यात्रा, अशा अनेक मोहिमा रत्नाकर शेजवळ यांनी पूर्ण केल्या आहेत.

सामाजिक सद्‌भाव आणि एकतेचा संदेश या प्रवासात त्यांच्या टीमने दिला आहे. या प्रवासात सामाजिक संस्था, शाळा, मंगल कार्यालये, देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अशा ठिकाणी राहून यात्री संवाद केला आहे. "जोडो भारत - जय जगत" चा नारा देत खूप प्रवास केला आहे. रत्नाकर शेजवळ हे श्रवण दिव्यांग खेळाडू असूनही गेल्या वीस वर्षापासून शांती सद्‌भावनेचे सायकलिंग दौरे सातत्याने करीत आहेत.

Success story
Success story: दिव्यांग असूनही नताशा जोशीने जग जिंकलं; प्रेरणादायी कहाणी वाचून थक्क व्हाल

"माझी आई- माझे कान आहे, माझा आवाज आहे" असं म्हणणाऱ्या रत्नाकर शेजवळ यांनी जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याचा विचार करुन ताठ कण्याने आपला जीवनप्रवास प्रेरणादायी केला आहे. वाहतूक नियंत्रण रॅली, तंबाखू मुक्त रॅली, रक्तदान शिबीरे, झाडे लावा झाडे जगवा, निर्भया नाईट वॉक, अंधांसाठी विशेष जागरण, पर्यावरण आणि प्रदूषण -यांसारख्या अनेक मोहिमांमधे सक्रीय सहभाग रत्नाकर शेजवळ घेत आहेत आणि भविष्यातही सहभाग घेण्याचा त्यांना मानस आहे.

Success story
Success story: दिव्यांग असूनही तो हरला नाही...! आपल्यासारख्याच इतरांसाठी उभारलं दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पाहा पारस यांची यशोगाथा

नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान अशी त्या अशी त्यांची आंतरराष्ट्रीय सायकलयात्रा थक्क करणारी आहे.

अतिशय खडतर आणि वेदनादायी बालपण, बहिरेपणाची लोकांनी केलेली थट्टा, कधी कधी खिल्ली उडवून हसण्याचे अनुभव, आईचे कष्ट हे सारे अनुभव पाठीशी असणाऱ्या रत्नाकर शेजवळ यांना दोन जीवलग मित्र मिळाले. आणि पुढे पावलो पावली मदत करणारी देव माणसे भेटली. त्यांच्यामुळे आज मी आहे, असे कृतज्ञतेने रत्नाकर शेजवळ सांगतात.

नूतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com